वृत्तसंस्था
हैदराबाद : Jainur :तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर येथे 45 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणानंतर आदिवासी संघटनांनी निदर्शने केली. Rape-murder attempt in Jainur
बुधवारी (४ सप्टेंबर) सकाळी सुरू झालेल्या या निदर्शनाचे दुपारपर्यंत दोन गटांमध्ये हाणामारीत रूपांतर झाले. आरोपी आणि पीडिता वेगवेगळ्या धर्माचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुमारे 2 हजार आंदोलक आदिवासींनी आरोपी समाजाच्या लोकांवर हल्ला केला. त्यांच्या धार्मिक स्थळावर दगडफेक केली. दुकानेही जाळली. प्रत्युत्तर म्हणून आरोपींच्या समुदायातील लोकांनीही जाळपोळ आणि दगडफेक केली.
Eknath Shinde : एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरपाई देणार, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जैनूर शहरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून प्रशासनाने परिसरातील इंटरनेट बंद करून पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.
बुधवारी संध्याकाळपर्यंत जलद कृती दलाला पाचारण करून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. पोलिसांनी संध्याकाळी उशिरा सांगितले की परिस्थिती आता नियंत्रणात आहे, परंतु अद्याप संचारबंदी उठवण्यात आलेली नाही.
4 दिवसांपूर्वी ऑटोचालकाने बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केला होता
पोलिसांनी सांगितले की, 31 ऑगस्ट रोजी एका ऑटोचालकाने 45 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने गजर केला असता आरोपीने तिच्या तोंडावर व डोक्यावर काठीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
महिला बेशुद्ध झाल्यावर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी महिलेला जैनूर रुग्णालयात नेले, तेथून तिला उपचारासाठी हैदराबादला रेफर करण्यात आले.
महिलेला शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध लैंगिक छळ, खुनाचा प्रयत्न आणि एससी/एसटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rape-murder attempt in Jainur
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले