वृत्तसंस्था
हैदराबाद : तेलंगणमध्ये साईबाबाद येथे सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचा त्याला पकडून एन्काऊंटर करू, असे तेलंगणचे मंत्री चमकूला मल्ला एचडी रेड्डी यांनी म्हटले आहे. Rape and murder of a minor girl; Will encounter the accused; Statement of the Minister of Telangana
आम्ही सरकार म्हणून बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे आहोत. त्यांना आम्ही मदत करू. पण लवकरात लवकर या कुणासोबत गुन्ह्यातील आरोपीला पकडून त्याचा एन्काऊंटर करण्यात येईल, असे चमकुला रेड्डी यांनी सांगितले.
हैदराबाद पोलिसांनी तीस वर्षे आरोपी राजू याला पकडण्यासाठी दहा लाख रुपयांचे इनाम लावले असून विविध ठिकाणी पोलिसांच्या टीम त्याला अटक करण्यासाठी रवाना झाल्या आहेत.
तेलंगणमध्ये या बलात्कार प्रकरणामुळे प्रचंड संतापाची भावना असल्याने हैदराबाद पोलिसांनी तातडीने कारवाईसाठी पथके तयार केली आहेत तसेच या संतापातून चमकुला रेड्डी यांचे आरोपीच्या एन्काउण्टरचे विधान आले आहे.
Rape and murder of a minor girl; Will encounter the accused; Statement of the Minister of Telangana
महत्त्वाच्या बातम्या
- दहशतवादी हल्याचा कट दिल्ली पोलीसांनी उधळून लावला, सहा जणांना अटक, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात, दिल्लीत हल्याची योजना
- पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदारांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, तृणमूलच्या गुंडांनी घडविल्याचा आरोप
- LJP खासदार राजकुमार राजाविरुद्ध बलात्कार प्रकरण; चिराग पासवान यांच देखील नाव
- काळा कोट परिधान केला म्हणजे आपले जीवन अन्य लोकांपेक्षा अधिक मौल्यवान नाही, वकिलांच्या कुटुंबाला ५० लाख भरपाईची याचिका फेटाळली