• Download App
    ranvir shorey apologise ahea of ram mandir pran pratishtha in ayodhya says i am Aashamed

    अयोध्येतील राम मंदिराला विरोध केल्याबद्दल अभिनेता रणवीर शौरीला वाटली लाज, मागितली जाहीर माफी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : तब्बल 550 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहून तिथे आता श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ आली असताना राम मंदिर आंदोलनाला तीव्र विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांना, अभिनेत्यांना, सेलिब्रिटीजला नव नवी उपरती होत आहे. ranvir shorey apologise ahea of ram mandir pran pratishtha in ayodhya says i am Aashamed

    अयोध्येत भव्य राम मंदिर साकार होत असल्याने त्यांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा दारुण पराभव तर झालाच आहे, पण राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी ओकलेल्या गरळी बद्दल देखील काही लोकांना उपरती झाली आहे, तर काही लोकांना लाज वाटत आहे.

    जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला हे राम मंदिर आंदोलनाचे कट्टर विरोधक होतेच. त्यांनी वेळोवेळी राम मंदिराला विरोधी केला होता. पण आता राम मंदिर उभे राहिले असताना त्यांना भगवान श्रीराम फक्त हिंदूंचा नव्हे, तर सगळ्यांचा देव असल्याची उपरती झाली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या तर जगातल्या कुठल्याही मंदिरात जायला तयार आहेत, पण आधी निमंत्रण तर येऊ द्या, असे म्हणून त्या राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमंत्रणाकडे डोळे लावून बसल्या आहेत. शरद पवार तसेही मंदिरात जात नाहीत. मंदिर आणि पूजा आर्ची पासून दूर असतात, हे त्यांनी स्वतःच सांगितले पण त्यांची कन्या मात्र राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमंत्रणाकडे डोळे लावून बसली आहे, हे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसची धर्मनिरपेक्षता किती बेगडी आहे, हे दाखवून देते आहे.

    बॉलीवूडचा अभिनेता रणवीर शौरीने मात्र आपण राम मंदिर आंदोलनाला विरोध करून फार मोठी चूक केली, याचा आपल्याला पश्चाताप होतो आहे, असे उघडपणे म्हटले आहे. त्याबद्दल त्याने जाहीर माफी मागितली आहे. राजकीय नेत्यांना होणारी उपरती वेगळी आणि रणवीर सारख्या अभिनेत्याने जाहीर माफी मागणे ही गोष्ट वेगळी हे त्याच्या प्रामाणिकपणातून दिसून आले आहे.

    रणवीर शौरिने राम मंदिरा बाबत एक ट्विट केले आहे, त्यात तो म्हणतो :

    मी अशा अनेक हिंदूंपैकी एक होतो, जे #अयोध्येतील मंदिराचा त्याग करण्यास इच्छुक होते आणि त्या जागी स्मारक किंवा रुग्णालय असावे, त्यामुळेच आपण समुदायांमधील हा दीर्घकाळ चाललेला संघर्ष संपवू शकू. पण आज मला लाज वाटते की मी शांततेच्या वेदीवर धार्मिकतेचा त्याग करण्यास तयार होतो. आता मला लाज वाटते की मी मर्यादापुरुषोत्तम श्री राम आणि त्यांच्या मूल्यांसाठी उभा राहिलो नाही.

    सत्य आणि न्यायासाठी ही प्रदीर्घ आणि कठोर लढाई लढणाऱ्या प्रत्येकाचे माझे मनःपूर्वक अभिनंदन आणि अभिनंदन. मी प्रभू रामाला क्षमा आणि भविष्यासाठी सद्बुद्धीची प्रार्थना करतो. मी प्रार्थना करतो की आपल्या या महान भूमीत धर्म अनंतकाळ टिकून राहो आणि #भारतातील सर्व लोकांसाठी शाश्वत शांती आणि समृद्धी घेऊन येवो. जय श्री राम.

    ranvir shorey apologise ahea of ram mandir pran pratishtha in ayodhya says i am Aashamed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

    Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट