Thursday, 8 May 2025
  • Download App
    Ranveer Allahbadia रणवीर + समय + अपूर्वा सह सर्वजण NCW च्या सुनावणीला गैरहजर; वैयक्तिक सुरक्षेविषयी व्यक्त केली भीती, आयोगाने सुनावणीच्या दिल्या नव्या तारखा!!

    रणवीर + समय + अपूर्वा सह सर्वजण NCW च्या सुनावणीला गैरहजर; वैयक्तिक सुरक्षेविषयी व्यक्त केली भीती, आयोगाने सुनावणीच्या दिल्या नव्या तारखा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : “इंडियाज गॉट लेटंट” शो मध्ये आई-वडिलांसंदर्भात अश्लील शेरेबाजी केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत युट्युबर रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखिजा, जसप्रीत सिंग आशिष चनचलानी, तुषार पुजारी, सौरभ बोथरा आणि बलराज घई या सर्वांना सुनावणीसाठी आज तारीख 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, आजच्या सुनावणीला यापैकी कोणीही वेगवेगळी कारणे देऊन हजर राहिले नाही. आपापल्या वकिलांमार्फत त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे गैरहजेरीचे कारण सांगितले. या कारणांवर कायदेशीर तरतुदीनुसार विचार करून राष्ट्रीय महिला आयोगाने या सर्वांना सुनावणीसाठी नव्या तारखा जारी केल्या. ६ ते ११ मार्च दरम्यानच्या या तारखा दिल्या. आता या नियोजित तारखांना या सगळ्यांना सुनावणीसाठी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहावे लागेल.

    रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखिजा यांनी आपल्या वैयक्तिक सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करणारी पत्रे आपपल्या वकिलांमार्फत राष्ट्रीय महिला आयोगाला दिली. सध्या वातावरण तापलेले आहे. ते थंड झाल्यानंतर सुनावणीला हजर राहू. तशी परवानगी द्यावी, अशी विनंती असे या तिघांनी त्या पत्रात वकिलांमार्फत नमूद केले. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या विनंतीचा कायदेशीर दृष्ट्या विचार करून या सर्वांना ६ मार्च रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले.

    जसप्रीत सिंग, बलराज घई यांनी नियोजित परदेश दौऱ्याचे कारण महिला आयोगाला लिखित स्वरूपात पाठवले. भारतात परतल्यानंतर सुनावणीला हजर राहू, अशी कबुली दिली. आयोगाने त्यांना ११ मार्च रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले.

    मात्र “इंडियाज गॉट लेटेंट” या शो चे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांनी आयोगाच्या आधीच्या समन्सला कोणतेही उत्तर न देता ते सुनावणीला गैरहजर राहिले. त्यावरून आयोगाने त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीवर तिखट ताशेरे ओढले आणि त्यांना ६ मार्च रोजी सुनावणीला हजर राहण्याचे नवे समन्स बजावले.

    Ranveer Allahbadia, Apoorva Mukhija, Ashish Chanchlani, Tushar Poojari and Saurabh Bothra summoned on March 6.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी