प्रतिनिधी
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ती शताब्दी कार्यक्रमाला आज पुण्यात शानदार सुरुवात झाली. येरवड्यात झालेल्या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते. Randeep Hooda flags off the Swatantraveer Sawarkar Mukti Shatabdi Yatra from Yerwada Central Jail in Pune
सध्या बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या आगामी सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता, तर आज रणदीप पुण्यात काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेत सहभागी झाला.
त्याने येरवडा मध्यवर्ती कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हातात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मुर्ती घेऊन रणदीप या यात्रेत सहभागी झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती. आज या ऐतिहासिक घटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याने ही यात्रा काढण्यात आली होती.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अभिनेता रणदीप हुड्डाने सांगितले की “आजचा दिवस ऐतिहासिक होता जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती. ते येथून सुटका झाल्यानंतर रत्नागिरीला गेले होते. तेथे त्यांना इंग्रजांनी 13 वर्षे नजरकैदेत ठेवले होते.
आज या घटनेला आज 100 वर्षे पूर्ण झाली…आम्ही प्रतीकात्मकरित्या त्यांची तुरुंगातून सुटका करणार आहोत. असे स्वातंत्र सेनानी ज्यांच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. त्यासाठी काम करणे आणि मी याचा भाग झाल्याचा खूप आनंद होत आहे.
मला आशा आहे की माझ्या चित्रपटाद्वारे त्याच्याबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी काय बलिदान केले हे लोकांना कळावं. लोकांनी त्यांच्या बद्दल जास्त वाचलेले नाही. जर लोकांनी वाचलं आणि माझा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना हे कळाले की त्यांची चुकीची प्रतिमा जगासमोर दाखवण्यात आली आहे. यावेळी त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने घोषणाही दिल्या.
सावरकर सिनेमा लवकर रिलीज
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्र आणि लंडनमध्ये झाले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची असून उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजेंड स्टुडिओ, निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान यांनी केली आहे.
तर चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी बाजू सांभाळली आहे. भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदीराम यांसारख्या अनेक क्रांतिकारकांवर वीर सावरकरांच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचेही या चित्रपटाच्या टिझरमध्ये सांगण्यात आले आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल.
Randeep Hooda flags off the Swatantraveer Sawarkar Mukti Shatabdi Yatra from Yerwada Central Jail in Pune
महत्वाच्या बातम्या
- शासन आपल्या दारी कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यात 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटींचे लाभ!!
- पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या, नॅशनल असेंब्लीची निवडणूक बेमुदत पुढे ढकलली; लष्करी राजवटीचा धोका वाढला!!
- सोमालियाजवळ ‘लीला’ जहाजाचे अपहरण, जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स!
- महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत आणखी भूकंप; राष्ट्रवादीत खळबळ, सगळ्या विरोधी पक्षाची स्पेस काँग्रेससाठी मोकळी??