• Download App
    राणा दाम्पत्याची भावपूर्ण भेट; नवनीत राणांनी अनुभवली इंग्रजांच्या काळातील जेल!! Rana couple's emotional visit; Navneet Rana experienced the prison of the British era

    Navneet Rana : राणा दाम्पत्याची भावपूर्ण भेट; नवनीत राणांनी अनुभवली इंग्रजांच्या काळातील जेल!!

    प्रतिनिधी

    मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची आज 12 दिवसांच्या जेलमधून अखेर सुटका झाली. नवनीत राणा यांना छातीत दुखण्याचा त्रास झाल्यामुळे ताबडतोब लिलावती रुग्णालयात दाखल केले. त्यांना स्पॉंडिलायसिसचाही त्रास आहे. तेथे आमदार रवी राणा पोचल्यानंतर नवनीत राणा अश्रू अनावर झाले. पती-पत्नींचे हे भावपूर्ण क्षण काही कॅमेऱ्यांनी टिपले. या भेटीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नवनीत राणा यांच्या प्रकृतीची जेल प्रशासनाने प्रचंड हेळसांड केल्याचा आरोप रवी राणा यांनी या भेटीनंतर केला आहे. Rana couple’s emotional visit; Navneet Rana experienced the prison of the British era

    भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली. खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये ज्याप्रकारे वागणूक देण्यात आली आहे हे पाहता यातून इंग्रजांच्या काळातील जेलची आठवण येत आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

    स्पॉन्डिलेसिसकडे जेल प्रशासनाचे दुर्लक्ष 

    नवनीत राणा यांना जामीन दिल्यावर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सोमय्या त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सोमय्या माध्यमांशी बोलत होते. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे कारागृहातील अनुभव ऐकून ठाकरे सरकारमधील कारागृह हे इंग्रजांच्या काळातील आहेत का, असे वाटत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. खासदार राणा यांना ७ तास पाणी दिले नाही, नवनीत राणा यांनी जेल प्रशासनाने त्यांना होत असलेल्या स्पॉन्डिलेसिस आजाराबाबत सांगितले तरी डॉक्टरांनी ते गांभीर्याने घेतले नाही. ज्या देशात राम मंदिर निर्माण होत आहे, त्या देशात हनुमान चालीसा म्हणण्यास प्रतिबंध केला जात आहे, हे दुर्दैवी आहे, असेही सोमय्या म्हणाले.

    नवनीत राणांना फरशीवर झोपवले 

    नवनीत राणा यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत. त्यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांना फरशीवर बसवून ठेवले. झोपायला लावले. नवनीत राणा यांनी डॉक्टरांना त्यांच्या स्पॉन्डेलिसिस आजाराबाबत सांगितले, पण जेल प्रशासनाने त्याविषयी कोणतीही कारवाई केली नाही. हे इंग्रजांच्या काळातील जेल प्रशासनाची आठवण येते, याचा देशातील प्रत्येक नागरिकाला संताप येत असेल, असेही सोमय्या म्हणाले.

    Rana couple’s emotional visit; Navneet Rana experienced the prison of the British era

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक