• Download App
    गंगा गोदावरी आरतीतून उज्ज्वल ऐतिहासिक पुरुषार्थी गाथा प्रकाशमान, आरती चिरंतन निरंतर राहो; संत महंतांचे आशीर्वाद!! Ramtirth gangs godavari aarti big spiritual event held at goda ghat

    गंगा गोदावरी आरतीतून उज्ज्वल ऐतिहासिक पुरुषार्थी गाथा प्रकाशमान, आरती चिरंतन निरंतर राहो; संत महंतांचे आशीर्वाद!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : गंगा गोदावरी आरतीने या पवित्र नाशिक नगरीमध्ये महान इतिहासाला उजाळा मिळाला आहे. भगवान राम, छत्रपती शिवाजी महाराज, देवी अहल्या आणि कुंभाच्या संतांची उज्वल ऐतिहासिक पुरुषार्थी गाथा प्रकाशमान झाली आहे. ही गंगा गोदावरीची आरती चिरंतन निरंतर राहो, असे आशीर्वचन संत महतांनी उद्गारले. गंगा गोदावरी आरतीला उपस्थित राहून संत महंतांच्या भक्ती भावना गदगदून आल्या. Ramtirth gangs godavari aarti big spiritual event held at goda ghat

    श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि श्रीराम मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट उपसले, ते प. पू. गोविंददेव गिरीजी महाराज, विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य तसेच नाथ परंपरेचे 18 वे पीठाचार्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि इस्कॉन संचालन समितीच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य तसेच इस्कॉनच्या गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग प्रभुजी, महादेव गिरी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत स्वप्निलराजे होळकर यांच्या शुभहस्ते गंगा गोदावरी महाआरती करण्यात आली. गंगा गोदा घाटावर हा अनुपम्य भव्य सोहळा झाला. हजारो नाशिककरांनी तो याची देही याची डोळा अनुभवला.

    गंगा गोदावरी आरतीने हरखून गेलेल्या संत महतांनी आपल्या भावना व्यक्त करून नाशिककरांना शुभाशीर्वाद दिले. आपल्या संदेशात गोविंदगिरी देव महाराज म्हणाले, नाशिकच्या पवित्र भूमीत रामकथा सादर करण्याची संधी मिळाली हे मी माझे परमभाग्य समजतो, असे सांगून रामकथा लोकांच्या मनामनात रुजली आहे. अयोध्येत अडीच एकराच्या जागेसाठीचा 500 वर्षे चाललेला लढ्याचे फळ 22 जानेवारी 2024 ला मिळाले हे लक्षात घेतले पाहिजे, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

    गंगा गोदावरी आरतीच्या संदर्भातल्या भावना त्यांनी कागदावर उतरविल्या. यामध्ये गोविंदगिरी देव महाराज म्हणतात :

    गोड सदा बोलावे
    नम्रपणे लोकप्रिय व्हावे
    हाचि निरोप गुरूंचा
    भक्तीने रघुपतीस आळवावे!

    असाच संदेश जितेंद्रनाथ महाराज आणि गौरांग प्रभू यांनीही दिला.

    आपल्या संदेशात जितेंद्रनाथ महाराज म्हणतात :

    गंगा गोदावरी आरतीला उपस्थित राहण्याचा योग आला या अर्थाने इतिहासाला उजाळा मिळाला. देवी अहल्या छत्रपती शिवाजी महाराज भगवान राम व कुंभाच्या संतांची ऐतिहासिक उज्वल पुरुषांची गाथा पुन्हा या निमित्ताने प्रकाशमान झाली ही आरती चिरंतन निरंतर राहो हा शुभाशीर्वाद!!

    गंगा गोदावरी आरती एक दैवी आणि अध्यात्मिक चैतन्याचे प्रतीक आणि त्याचा कलात्मक अविष्कार आहे, अशा भावना गौरांग प्रभू जी महाराज यांनी व्यक्त केल्या.

    रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्काराच्या गोविंददेव गिरी महाराजांना प्रदान!!

    नदी संस्कृतीचे अस्तित्व जतन करणे तसेच धर्म समाज आणि राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती घेणाऱ्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार श्री गोविंददेवगिरी महाराज यांना रामतीर्थ गोदाघाट येथे शानदार सोहळयात आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि गौरांग प्रभुजी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

    स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि महादक्षिणा असे पुरस्काराचे स्वरूप होते. नाशिककरांतर्फे माधवदेव गिरी महाराज यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. यावेळी श्रीरामाच्या जयघोषाने पवित्र गंगा गोदावरीचा परिसर दणाणाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत स्वप्नीलराजे होळकर प्रमुख उपस्थिती हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. वैभव जोशी आणि विजय जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्शवादाची जोपासना करण्याची गरज स्वप्निल राजे होळकर यांनी व्यक्त केली.

    आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या भाषणात प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. नाशिक ही संतांची पुण्यभूमी आहे. नाशिककरांच्या आंतरिक सादाला साथ देऊन पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांनी महादेव गिरी महाराज यांचे कौतुकही केले. गौरांग प्रभू यांनीही आपल्या भाषणात नाशिकनगरीचे महत्व विषद करून माधवगिरी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले.

    प. पू. गोविंद देवगिरीजी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेचे उपाध्यक्ष आहेत.श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यांनी अपार कष्ट उपसले. सनातन वैदिक धर्म आणि संस्कृती यांचा देश विदेशात प्रसार करण्याचे व्रत घेऊन त्यांनी घरोघरी श्री भगवद्गीता पोहोचविली आहे. हिंदू बांधवांसाठी वेदांतील ज्ञानसागर खुला व्हावा यासाठी देशभरात वेद पाठशाळा सुरू करून तसेच सनातन धर्माला अनुलक्षून त्यांनी जनमानसाला वेददीक्षा दिली आहे. त्यामुळेच त्यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे, असे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया आणि स्वागताध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.

    स्वानंद बेदरकर यांनी आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन केले. यावेळी व्यासपीठावर भक्तीचरणदास महाराज हे उपस्थित होते. यावेळी नरेंद्र कुलकर्णी, आशिमा केला, वैभव क्षेमकल्याणी, विजय भातांबरेकर, शिवाजी बोंदार्डे, प्रेरणा बेळे, रणजित सिंग आनंद, विजय जोशी, रामेश्वर मलानी, उदयन दीक्षित, राजेंद्रनाना फड, गुणवंत मणियार आदी उपस्थित होते. हजारो नाशिककरांनी उपस्थित राहून हा आनंद सोहळा अनुभवला.

     

    Ramtirth gangs godavari aarti big spiritual event held at goda ghat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती