विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने येत्या 22 जानेवारीला श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. rammandir inaguration Public holiday announced in Maharashtra
उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये आधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिल लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. 22 जानेवारीला देशभरात दीपावली साजरी करावी, घरोघरी दिवे लावण्यात यावेत, दीपोत्सव साजरा करण्यात यावा. प्रत्येक घरात रामज्योत प्रज्ज्वलित करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पणाचा कार्यक्रम हा अतिशय भव्यदिव्य असा असणार आहे. या कार्यक्रमाला देश-विदेशातील 6000 व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. यामध्ये सिनेकलाकार, आंतरराष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश असणार आहे. हा सोहळा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक व्हावा यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्येला सजवलं जात आहे. अयोध्येत त्यासाठी अतिशय जय्यत तयारी सुरु आहे.
rammandir inaguration Public holiday announced in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- दावोसमध्ये 3.53 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार करून मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत!!
- वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!
- अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!
- राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!