• Download App
    आंदोलनांनी अजरामर झालेल्या रामलीला मैदानावर होणार आता एक हजार खाटांचे कोविड सेंटर|Ramllila ground will convert in to covid hospital

    आंदोलनांनी अजरामर झालेल्या रामलीला मैदानावर होणार आता एक हजार खाटांचे कोविड सेंटर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणीबाणीच्या परिस्थितीत ऐतिहासिक रामलीला मैदानाचेच रूपांतर रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये करण्याचे ठरवले आहे. रामलीला मैदानावर १००० खाटांचे उभारण्यात उभारण्यात येणार असून ते ५ मेपासून सुरू होईल.Ramllila ground will convert in to covid hospital

    लोकनायक जयप्रकाश नारायण रूग्णालयाच्या बरोबर समोर असणाऱ्या या या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पाचशे खाटांचा अतिदक्षता विभाग खाटांचा व सर्वसामान्य उपचार कक्ष असे दोन भाग असतील.



    दिल्ली सध्या बेहाल झाली असून गेल्या आठ दिवसांपासून दररोज २० हजाराच्या वर नवे रुग्ण आढळत आहेत. सर्व रुग्णालयांमधील परिस्थिती अत्यंत गंभीर व भीषण असून नवीन व्यवस्था केल्याशिवाय

    दिल्लीतील परिस्थिती हाताळणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि अनेक स्वयंसेवी संस्था आता तात्पुरत्या कोविड रुग्णालयांच्या उभारणीला लागले आहेत.

    याच काळात कोरोना चाचण्या आणि लसीकरण यांचा वेग मात्र प्रचंड मंदावला आहे असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अधिकाधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडणे म्हणजेच पॉझिटिव्हिटी दर ३५ टक्यांको पर्यंत वाढणे हाही सरकारच्या काळजीचा विषय ठरू शकतो.

    Ramllila ground will convert in to covid hospital

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!