• Download App
    मराठमोळा रमेश पोवार : दिग्गजांना पछाडत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी Ramesh Powar appointed Head Coach of Indian Womens Cricket team

    मराठमोळा रमेश पोवार : दिग्गजांना पछाडत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी

    • काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला भारतीय संघासाठी प्रशिक्षक शोध मोहिम सुरु केली होती. अखेर या भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची वर्णी लागली आहे.

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली  : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी फिरकीपटू रमेश पोवारची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि ३५ हून अधिक जणांनी या पदासाठी आपले नाव दिले होते.Ramesh Powar appointed Head Coach of Indian Womens Cricket team

    बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

    पोवार यांनी अनेक दिग्गजांना पछाडत बाजी मारली आहे. पोवार डब्ल्यूव्ही रमन यांची जागा घेणार आहेत. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी १३ एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अर्ज दाखल केले होते. मात्र सर्व प्रक्रियेनंतर पोवार सरस ठरले आहेत.

    एकूण ३५ अर्ज

    महिल्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण ३५ जणांनी अर्ज केले होते. त्यातून ८ जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये डबल्यू व्ही रमन, रमेश पोवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश होता. या ८ जणांची मुलाखत ही (Cricket Advisory Committee) बीसीसीआयच्या सल्लागार समितीने घेतली. या समितीमध्ये मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंगचा समावेश होतेा. मात्र या ८ जणांना पोवार पुरुन उरले. अखेर सल्लागार समितीने पोवार यांची प्रशिक्षक पदासाठी नाव अंतिम केलं.

    Ramesh Powar appointed Head Coach of Indian Womens Cricket team

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र