• Download App
    मराठी माध्यमांमध्ये कसब्यातल्या पराभवाची चर्चा; पण नागालँड मध्ये आठवले गटाचा डंका!!ramdas athawale rpi wins 2 candidate in nagaland

    मराठी माध्यमांमध्ये कसब्यातल्या पराभवाची चर्चा; पण नागालँड मध्ये आठवले गटाचा डंका!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठी माध्यमांमध्ये कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाची जोरदार चर्चा आहे, पण तिकडे सुदूर पूर्वेकडे नागालँड मध्ये आठवले गटाने विजयाचा डंका वाजवला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला. ramdas athawale rpi wins 2 candidate in nagaland

    त्यातून माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी संपूर्ण महाराष्ट्राचा निष्कर्ष काढला आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटात विरोधात सुप्त लाट आहे. त्याचे प्रतिबिंब कसब्यात उमटले आणि आगामी महापालिका निवडणुका तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळेल, असा दावा मराठी माध्यमांनी केला आहे.



    पण तिकडे नागालँड मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आपल्या विजयाचा डंका वाजवला आहे. भाजप बरोबर आघाडी करत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीने नागालँड मध्ये 2 जागांवर विजय मिळवला आहे.

    नागालँड मध्ये आठवले गटाने 8 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 2 जागा खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे. रामदास आठवले यांनी नागालँड मध्ये जाऊन आपल्या पक्षाच्या उमेदवारांसह भाजप उमेदवारांचा प्रचारही केला होता. मुंबईतील नेते विनोद निकाळजे यांच्यावर नागालँडची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. या निवडणुकीत नागालँड मध्ये भाजप आघाडी सत्तेवर येणार आहे. त्यात आठवले गटाच्या 2 आमदारांचा वाटा असणार आहे.

    मात्र कसब्याच्या पराभवाच्या चर्चेपुढे मराठी माध्यमांनी चिंचवडचा भाजपचा विजय जसा झाकोळून टाकला आहे, तसाच नागालँड मधला आठवले गटाचा विजय देखील माध्यमांनी चर्चेत झाकोळला आहे. प्रत्यक्षात रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्रातील ताकद कमी असताना त्यांनी नाकारल्यानंतर विजय मिळवणे याला विशेष महत्त्व आहे. पण मराठी माध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

    ramdas athawale rpi wins 2 candidate in nagaland

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार