• Download App
    ममता बॅनर्जींच्या “खेला होबेला” रामदास आठवलेंचे “मोदींचा मेला होबेने” तिरकस उत्तर Ramdas Athawale replied with modi mela hoga to mamata`s 2024 me khela hoga

    ममता बॅनर्जींच्या “खेला होबेला” रामदास आठवलेंचे “मोदींचा मेला होबेने” तिरकस उत्तर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा उफाळून आलेल्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंगाली म्हण वापरली होती, “खेला होबे” म्हणजे आता त्यांचा खेळ होणार किंवा खेळ आटोपणार… पश्चिम बंगालची निवडणूक त्या जिंकल्या. त्यानंतर त्यांनी बंगालनंतर देशातही “खेला होबे” ही म्हण वापरली आहे. Ramdas Athawale replied with modi mela hoga to mamata`s 2024 me khela hoga

    पण त्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तितकेच तिरकस उत्तर दिले आहे. ते म्हणाले, की ममता बॅनर्जी म्हणतात की २०२४ मध्ये देशात “खेला होगा”. पण मी ममता बॅनर्जींना सांगू इच्छितो की २०२४ मध्ये “मोदींचाच मेला होणार” म्हणजे मोदीच पुन्हा निवडणूक जिंकून सत्तेवर येतील. भाजपला विरोधी पक्षांची भीती वाटत नाही. त्यांना हे माहिती आहे, की विरोधी पक्ष जेवढा भाजपला विरोध करतील तेवढा भाजप मजबूत होईल. त्यामुळेच मी म्हणतोय २०२४ मध्ये ममतांचा खेला नाही होणार. “मोदींचाच मेला” होणार…; असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी दिले.

    ममतांची म्हण खेला होगा आणि त्याला रामदास आठवलेंनी दिलेले प्रत्युत्तर मोदींचा मेला होगा याची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी विविध मिम्सद्वारे त्याची मजा घेतली आहे. अनेकांनी मोदी विरूध्द ममता अशी कार्टून टाकून त्यावर तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट केल्या आहेत.

    Ramdas Athawale replied with modi mela hoga to mamata`s 2024 me khela hoga

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार