• Download App
    पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह नाटकामुळे राडा, रामायणातील पात्राच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद, कलाकारांना चोप|Ramayana character's verbally offensive dialogues, actors beaten due to offensive play in Pune University

    पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह नाटकामुळे राडा, रामायणातील पात्राच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद, कलाकारांना चोप

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एका नव्या वादामुळे चर्चेत आहे. विद्यापीठातील ललित कला केंद्र ह्या विभागाच्या परीक्षा अभ्यासी नाट्यप्रयोगाचे नुकतेच आयोजन करण्याचा आले होते. यामध्ये ‘जब वी मेट’ ह्या नाटकाच्या प्रयोगात रामायणातील पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा आरोप होत आहे. यानंतर विद्यार्थी संघटनांनी गोंधळ घालत प्रयोग बंद पाडला. यामध्ये अभाविप (ABVP) च्या काही बाहेरील आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.Ramayana character’s verbally offensive dialogues, actors beaten due to offensive play in Pune University



    काय आहे प्रकरण?

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून आज संध्याकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणातील पात्र करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेश राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र, या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना चोपही देण्यात आला. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्र या विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवण्यात आली. त्याच बरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी-देवतांच्या पात्रांच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद पाडले. हिंदू देवीदेवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका अभाविप पुणेतर्फे घेण्यात आली आहे.

    Ramayana character’s verbally offensive dialogues, actors beaten due to offensive play in Pune University

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य