वृत्तसंस्था
माळवा : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रावण या शब्दातून टीका केली, तर भारत जोडो यात्रेत आता राहुल गांधी यांनी जनतेला राम समजावून सांगितला आहे. मध्य प्रदेशातील आगर माळवा येथे घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी रामाचा अर्थ जनतेला समजून सांगितला. Rama is not a person, but an ascetic way of life; Rahul Gandhi’s statement at Bharat Jodo Yatra
राहुल गांधी म्हणाले, की त्यांना एका पंडितजींनी सांगितले होते की भगवान राम हे तपस्वी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन तपस्येला दिले होते. राम एक व्यक्ती नव्हते, तर ती एक जीवन पद्धती होती. त्यांनी संपूर्ण दुनियेला प्रेम, भाईचारा, इज्जत आणि तपस्या दाखविली.
जेव्हा गांधीजी “हे राम” म्हणाले, तेव्हा रामाची भावना आपल्या अंतर्मनात निर्माण करायची हा त्याचा अर्थ होता. आपल्यालाही त्याच भावनेतून जगायचे आहे. रामाचा खरा अर्थ हाच आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.
सोशल मीडियावर राहुल गांधींची खिल्ली
राहुल गांधी यांच्या या भाषणानंतर सोशल मीडियात अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून राम हे धनुर्धारी योद्धे होते. त्यांनी रावणाचा वध केला, याची आठवण अनेकांनी करून दिली आहे. त्याचबरोबर अनेकांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना, यह बात तब की है, जब राहुल गांधी की दाढी सद्दाम हुसेन की तरह बढी नही थी, असे ट्विट केले आहे. काहींनी काँग्रेसच्या जुन्या भूमिकेची आठवण त्यांना करून दिली आहे. काँग्रेसने श्रीराम काल्पनिक होते, असे म्हटले होते हे राहुल गांधी विसरले का?, असा अहवाल काहींनी केला आहे.
Rama is not a person, but an ascetic way of life; Rahul Gandhi’s statement at Bharat Jodo Yatra
महत्वाच्या बातम्या