• Download App
    Digvijay Singh काँग्रेसच्या मजबुतीसाठी काँग्रेसचे नेते आले अयोध्येत श्रीरामाच्या चरणी!!

    काँग्रेसच्या मजबुतीसाठी काँग्रेसचे नेते आले अयोध्येत श्रीरामाच्या चरणी!!

    नाशिक : काँग्रेसच्या मजबुतीसाठी काँग्रेसचे नेते आले अयोध्येत श्रीरामाच्या चरणी!!, असा मोठा “राजकीय चमत्कार” 2026 मधल्या रामनवमीच्या दिवशी आज घडला. Digvijay Singh

    राजकीय आयुष्यभर ज्यांनी अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराला विरोध केला होता, तिथे मंदिर उभे राहिल्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये काँग्रेसचे कुठलेच वरिष्ठ नेते तिकडे फिरकले नव्हते. पण 2026 च्या रामनवमीच्या दिवशी आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय राय आणि खासदार प्रमोद तिवारी यांनी अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात जाऊन श्रीरामांची प्रार्थना केली. काँग्रेसच्या मजबुतीसाठी आणि सोनिया गांधींच्या आरोग्यासाठी आम्ही श्रीराम चरणी प्रार्थना केली, असे दिग्विजय सिंह यांनी अयोध्येच्या विमानतळावर सांगितले.

    काँग्रेसचा राम जन्मभूमी मंदिराला कधीच विरोध नव्हता. काँग्रेसला रामजन्मभूमीचे मंदिर बांधायचे होते, पण भाजपने रामाच्या नावाखाली आणि राम मंदिराच्या नावाखाली लोकांना फसविले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ लोकांच्या मतांसाठी राम जन्मभूमी मंदिर बांधणीचा राजकीय वापर केला, असा आरोप आणि दावा दिग्विजय सिंह यांनी केला. दिग्विजय सिंह यांच्या आरोप आणि दाव्याला अजय राय आणि प्रमोद तिवारी यांनी दुजोरा दिला.

    – मंदिर आणि मशीद एकच ठेवायचा “डाव”

    अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर मुख्य मंदिर उभे राहावे यासाठी देशभरच नाही तर जगभर आंदोलने झाली. ती सगळी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळांमध्ये झाली. अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर मशीद आणि मंदिर एकत्रित बांधायचा किंवा एकत्र ठेवायचा काँग्रेसच्या वेगवेगळ्या सरकारचा “डाव” होता. अयोध्येतील कारसेवेच्या वेळी मुलायम सिंग यादव यांच्या सरकारच्या काळात पोलिसांनी कारसेवकांना गोळीबार करून मारले. त्या मुलायम सिंग यादव यांच्या सरकारला काँग्रेसच्या पाठिंबा होता. पण राम मंदिराला विरोध करायचा‌ असला कुठलाच “डाव” यशस्वी होऊ शकला नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे राम जन्मभूमी मंदिर बांधायचा मार्ग मोकळा झाला म्हणून तिथे राम जन्मभूमी न्यास भव्य मंदिर उभारू शकला. या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली होती.



    सोनिया, राहुल, प्रियांकांची मंदिराकडे पाठ

    पण सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अद्याप राम मंदिराला भेट दिली नाही. प्रियांका गांधी सुद्धा अयोध्येतल्या राम मंदिराकडे अद्याप फिरकलेल्या नाहीत. तरीदेखील दिग्विजय सिंह यांनी आयोध्येतल्या राम मंदिराला काँग्रेसचा विरोधच नव्हता, असा दावा केला. पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या मजबुतीसाठी आणि सोनिया गांधींच्या आरोग्यासाठी आपण श्रीरामांना प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

    काँग्रेसची भूमिका दुटप्पी

    सगळ्या घडामोडींमधून काँग्रेसची दुटप्पी भूमिकाच उघड्यावर आली. जोपर्यंत राम मंदिर होत नव्हते, तोपर्यंत काँग्रेसने त्यात विविध मार्गांनी अडथळा आणला. राम मंदिर उभे राहिल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. पण राम मंदिर प्रस्थापित झाले, त्याची कीर्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली, त्यामुळे काँग्रेससाठी राजकीय अपरिहार्यता झाली म्हणूनच काँग्रेसच्या नेत्यांनी अयोध्येतल्या राम मंदिरात येऊन रामाला काँग्रेसच्या मजबुतीसाठी प्रार्थना केली. किंबहुना त्यांना तशी प्रार्थना करावी लागली. किंवा रामानेच त्यांना तशी बुद्धी दिली त्या पलीकडे काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्याला दुसरा कोणताही अर्थ नव्हता.

    Ram Navami, Digvijay Singh will be addressing the Congress’s Uttar Pradesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Petroleum Ministry : सरकारने म्हटले- देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही; किंमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, घाबरून गरजेपेक्षा जास्त खरेदी करणे टाळा

    S. Jaishankar : जयशंकर म्हणाले- आपण पाकसारखे दलाल देश नाही; सर्वपक्षीय बैठकीत विरोधक म्हणाले होते- इराण युद्धात पाकची मध्यस्थी, भारत केवळ मूकदर्शक

    Indian Railways : ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलता येईल; 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास 50% परतावा; 1 एप्रिलपासून नवीन नियम