• Download App
    श्री रामलल्ला सुप्रतिष्ठित झाले; अयोध्येसह देशभर दीपोत्सवाची धूम; भव्य रामजन्मभूमी मंदिरही लक्षदीपांनी उजळले!! Ram Janmabhoomi Temple was also lit up with lamp

    श्री रामलल्ला सुप्रतिष्ठित झाले; अयोध्येसह देशभर दीपोत्सवाची धूम; भव्य रामजन्मभूमी मंदिरही लक्षदीपांनी उजळले!!

    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : अयोध्येत भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच सायंकाळी अयोध्येसह संपूर्ण देशभर दीपोत्सवाची धूम सुरू झाली. भारतातल्या आणि परदेशातल्या लाखो गावा शहरांमध्ये लाखो मंदिरांमध्ये घराघरांमध्ये श्रीराम ज्योत उजळली. Ram Janmabhoomi Temple was also lit up with lamp

    शरयू घाटावर दीपोत्सव सुरू झाला असून त्यामध्ये अयोध्येत जमलेले हजारो राम भक्त उत्साहात सहभागी झाले आहेत. सर्वत्र श्रीराम आरती, राम पाठ, रामरक्षा पठण सुरू आहे. देशभरातल्या आणि परदेशांमधल्या सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करून खऱ्या अर्थाने पौष महिन्यात दीपावली साजरी होत आहे.

     

    या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत.

    Ram Janmabhoomi Temple was also lit up with lamp

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Epstein files : राजकीय भवितव्य वर्तविण्यामागे पृथ्वीराज बाबांचा नेमका डाव काय??

    West Bengal : पश्चिम बंगालमधील विद्यापीठांमध्ये राज्यपालच असतील कुलपती; राष्ट्रपतींनी सुधारणा विधेयकांना मंजुरी दिली नाही

    PM Modi : मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान; द ग्रेट ऑनर निशाण मिळवणारे पहिले जागतिक नेते बनले