• Download App
    रेल्वेच्या देशभरात धावल्या तब्बल ११५ ऑक्सिजन एक्सप्रेस, विविध राज्यांना आठ हजार टन पुरवठा|Raliway provides oxygen through 115 trains

    रेल्वेच्या देशभरात धावल्या तब्बल ११५ ऑक्सिजन एक्सप्रेस, विविध राज्यांना आठ हजार टन पुरवठा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारताच्या कानाकोपऱ्यात कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वेने अखंड सेवा सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून रेल्वेच्या रो-रो सेवेद्वारे द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.Raliway provides oxygen through 115 trains

    आतापर्यंत देशात ११५ ऑक्सिजन एक्स्प्रेस धावल्या आहेत. देशातील विविध राज्यांना ४४४ पेक्षा जास्त टँकरमधून जवळपास ७,११५ मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे.



    देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा वेगात होण्यासाठी भारतीय रेल्वेच्या मदतीने रो-रो सेवेद्वारे १९ एप्रिलपासून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. तमिळनाडूसाठी ८० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन नेणारी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस पोहचली आहे,

    तर दिल्लीला आतापर्यंत ३९०० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन उतरवला आहे. डेहराडूनहून निघालेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून पंजाबला ४० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन पुरवठा केला आहे.

    ऑक्सिजनचा साठा घेऊन धावणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाना, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये दाखल होत आहेत. द्रवरूप ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या राज्यांना शक्य तेवढ्या लवकरात लवकर साठा पोहचविण्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे.

    त्यामुळे सध्या देशभरात ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून दररोज जवळपास ८०० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा जात आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

    Raliway provides oxygen through 115 trains

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य