दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आता राकेश टिकेत आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला सरळ धमकी दिली असून आम्हाला बळजबरी करून येथून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्यास देशातील सर्व सरकारी कार्यालये जमीनदोस्त करू अशी धमकी त्यांनी दिली आहेRakesh Tiket’s threat to the government, if the tent is demolished, all government offices in the country will be demolished
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आता राकेश टिकेत आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला सरळ धमकी दिली असून आम्हाला बळजबरी करून येथून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्यास देशातील सर्व सरकारी कार्यालये जमीनदोस्त करू अशी धमकी त्यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या वर्षभरापासून दिल्लीत सीमांवर आंदोलन करत आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक वेळा बैठका झाल्या मात्र शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून, कोणत्याही परिस्थित हे काळे कृषी कायदे रद्द करू, याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, अशी आक्रस्ताळी भूमिका घेतली आहे. टिकेत म्हणाले, जर आम्हाला बळजबरी करून येथून काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देशातील सर्व सरकारी कार्यालये जमीनदोस्त करून टाकू. सरकार आंदोलनकर्त्यांना हटवण्याचे प्रयत्न करत असून, जेसीबी साहाय्याने आमचे तंबू पाडण्याचे प्रयत्न करत आहे. जर असे झाले तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आमचे तंबू तयार करू.
टिकैत यांनी दावा केला आहे की, पोलीसांना बॅरीकेट्स काढून आंदोलनकर्त्यांना तंबू तोडण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र पोलीसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पोलीस म्हणाले की, तंबू आम्ही तोडलेले नसून, फक्त शेतकऱ्यांना तेथून हलविण्याचा प्रयत्न केला आहे. जर शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही आमच्या पद्धतीने शेतकऱ्यांना थांबवू. दिल्लीतील सीमांवर शेतकरी आणि पोलीसांमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आंदोलनस्थळावरील आजूबाजूच्या नागरिकांना या आंदोलनामुळे अनेक गोष्टीचे त्रास होत असून, शेतकऱ्यांनीनी रस्ता देखील बंद केला आहे. त्यामुळे शेतकºयांनी आंदोलनस्थळावरून उठवण्याची मोहिम सुरु आहे.
Rakesh Tiket’s threat to the government, if the tent is demolished, all government offices in the country will be demolished
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानात संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या, तालिबानने दोन आरोपींना केली अटक, एक फरार
- चीनच्या उलट्या बोंबा : म्हणे – कोरोनासाठी वुहान मार्केट नाही, तर सौदीचे झिंगे अन् ब्राझीलचं बीफ जबाबदार
- आंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला
- विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार