विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाविरोधात 2015 पासून काम करत आहोत, आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांना आम्ही आघाडी सोडत असताना एक पत्र लिहिले होते. त्याची साधी दखलही आघाडीने घेतली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी सोबतही निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. परंतु, आता महाविकास आघाडी आपल्याला पाठिंबा देण्यास तयार असेल, तर मीदेखील पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. असे असले तरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये स्वाभिमानी पक्षाचा समावेश करणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.Raju Shetty’s Talyat-Malay; Mahavikas will take support of the alliance but will not join the alliance
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवावी असा प्रयत्न आघाडीच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, राजू शेट्टी यांनी वेगळी भूमिका घेतली. ते जर वेगळी भूमिका घेणार असतील तर आम्हाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचा उमेदवार द्यावा लागेल, असे म्हणत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच राजू शेट्टी यांनी आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, पाठिंबा घेणार असलो म्हणजे आपण महाविकास आघाडीमध्ये सामील झालेलो नाही. आमचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये येणार नाही. मात्र, आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने हे खासदार आहेत. ही जागा शिवसेनेकडे असल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या संदर्भात राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. धैर्यशील माने यांच्या विरोधात राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Raju Shetty’s Talyat-Malay; Mahavikas will take support of the alliance but will not join the alliance
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी संदेशखळी पीडितेला केला फोन, भाजपने बशीरहाटमधून दिली उमेदवारी
- कट्टर खालिस्तान विरोधी मुख्यमंत्री शहीद सरदार बेअंत सिंग यांचे नातू खासदार रवनीत सिंग बिट्टू भाजपमध्ये दाखल!!
- पूर्व आणि दक्षिणेतल्या राज्यांमधून खासदार संख्या वाढविण्याची भाजपला खात्री; पवार – ठाकरेंची फक्त महाराष्ट्रात 48 जागांमध्ये खेचाखेची!!
- पाकिस्तानच्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला; 4 दहशतवादी ठार, एक जवान शहीद; बलुच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी