वृत्तसंस्था
नोएडा : उत्तर प्रदेशात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांनी विक्रमी विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडामधून पंकज सिंह यांना 2 लाख 44 हजार 091 मते मिळाली आहेत. कोणत्याही विधानसभा निवडणुकीत आजवरचा देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विजय आहे.
Rajnath Singh’s son Pankaj Singh from Noida has a record majority
भाजपचे पंकज सिंह यांना 70.84 % मते मिळाली आहेत. पंकजा सिंह यांच्या विरोधात उभे असणारे समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला 62,722 मते मिळाली होती. विधानसभा निववडणुकीतील हा सर्वात मोठा विजय आहे. महाराष्ट्रातून अजित पवारांचा 1 लाख 65 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.
अजित पवारांनी त्यांच्या पारंपारिक बारामती या मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकावेळी 1.45 लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते.
पंकज सिंह यांनी जनतेचे आभार मानले आहेत. नोएडावासीयांनी दिलेल्या प्रेम, आशिर्वादामुळे मी निवडणूक जिंकली आहे. जनता, पदाधकारी, कार्यकर्ते यांच्यामुळे हा विजय मिळाला आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
Rajnath Singh’s son Pankaj Singh from Noida has a record majority
महत्त्वाच्या बातम्या
- Punjab Election Analysis : सुखविंदर सिंग बादल, कॅप्टन साहेबांचा पराभव सांगतोय काय…?? प्रादेशिक घराणेशाहीचा उखडला पाय…!!
- ELECTION 2022 : कौन जीता-कौन हारा… VIP हारले ! CM चन्नी, अमरिंदर, हरीश रावत, पुष्कर सिंह धामी,सुखबीर बादल यांचा पराभव …
- गोव्यात शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या उमेदवारांचेही डिपाॅझिट जप्त, ‘नोटा’पेक्षाही पडली कमी मते
- गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला ‘नोटा’पेक्षा कमी मते