• Download App
    Rajnath Singh राजनाथ सिंह यांनी SEO बैठकीत 'संयुक्त निवेदनावर'

    Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी SEO बैठकीत ‘संयुक्त निवेदनावर’ स्वाक्षरी करण्यास दिला नकार

    Rajnath Singh

    जाणून घ्या, नेमकं काय होतं कारण?


    विशेष प्रतिनिधी

    क्विंगदाओ – Rajnath Singh संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला, जिथे त्यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.Rajnath Singh

    राजनाथ सिंह यांनी एससीओ बैठकीत पाकिस्तानवर निशाणा साधला आणि सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. यासोबतच त्यांनी दोषींना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आणि भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेवर भर दिला.



    भारताच्या वतीने राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे संयुक्त निवेदन दहशतवादाविरुद्ध भारताची ठाम भूमिका दर्शवत नाही. असे दिसते की या निवेदनातून पहलगामचा उल्लेक पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून वगळण्यात आला आहे, कारण सध्या त्यांचा खास मित्र चीन संघटनेचा अध्यक्ष आहे. पहलगाम हल्ल्याचा उल्लेखच नाही तर त्याऐवजी दस्तऐवजात बलुचिस्तानचा उल्लेख करण्यात आला आहे आणि भारतावर नाव न घेता तेथे अशांतता निर्माण करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

    यापूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी किंगदाओ येथे झालेल्या या बैठकीत दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणातील बदलाची विस्तृत रूपरेषा सादर केली. यासोबतच, त्यांनी सदस्य देशांना सामूहिक सुरक्षा आणि सुरक्षिततेला असलेला हा धोका दूर करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

    संरक्षण मंत्री, एससीओ सरचिटणीस, एससीओ प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचना (RATS) चे संचालक आणि इतर प्रतिनिधींना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, या प्रदेशासमोरील सर्वात मोठी आव्हाने शांतता, सुरक्षितता आणि विश्वासाचा अभाव आहे. यासोबतच, त्यांनी वाढत्या कट्टरतावाद, अतिरेकीपणा आणि दहशतवादाचे वर्णन या समस्यांचे मूळ कारण म्हणून केले आहे.

    संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, जेणेकरून दहशतवाद रोखता येईल आणि सीमापार हल्ले रोखता येतील.

    संरक्षण मंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान, पीडितांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारावर गोळ्या घालण्यात आल्या. लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी गटाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
    ते पुढे म्हणाले, भारताची दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता त्याच्या कृतींमधून दिसून येते. यामध्ये दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार समाविष्ट आहे. आम्ही दाखवून दिले आहे की दहशतवादाची केंद्रे आता सुरक्षित नाहीत. त्यांना लक्ष्य करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.

    Rajnath Singh refuses to sign joint statement at SEO meeting

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले

    Praggnanandhaa : प्रज्ञानंदाने वर्ल्ड नंबर-1 कार्लसनला 39 चालींमध्ये हरवले; लास वेगास स्पर्धेत अव्वल