आरोपीने याआधीही अनेक मोठ्या परीक्षेचे पेपर लीक केले असून त्यासाठी तो तुरुंगातही गेलेला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश एसटीएफने पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी राजीव नयन मिश्राला बुधवारी सकाळी नोएडा येथून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने याआधीही अनेक मोठ्या परीक्षेचे पेपर लीक केले असून त्यासाठी तो तुरुंगातही गेला आहे.Rajiv Mishra, the main accused in the police recruitment exam case, was arrested by the Noida STF
उत्तर प्रदेश पोलिस भरती परीक्षा १८ फेब्रुवारीला झाली होती आणि काही दिवसांनी परीक्षेचे पेपर लीक झाल्याचे समोर आले होते. यानंतर योगी सरकारने परीक्षा पुन्हा घेण्याचे म्हटले होते. याशिवाय पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकही तयार करण्यात आले होते.
या प्रकरणात पहिली अटक एसटीएफने फेब्रुवारीमध्ये केली होती. व्हॉट्सॲपवर उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे पाठवणाऱ्या आरोपी नीरज यादवला एसटीएफने अटक केली होती. त्यानंतर ५ मार्च रोजी याप्रकरणी मोठी कारवाई करत यूपी पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना हटवण्यात आले.
सरकारने 14 जून 2023 रोजी 1990 बॅचच्या भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी रेणुका मिश्रा यांच्याकडे उत्तर प्रदेश पोलिस भरती आणि पदोन्नती मंडळाचे महासंचालक आणि अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.
Rajiv Mishra, the main accused in the police recruitment exam case, was arrested by the Noida STF
महत्वाच्या बातम्या
- नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग निवृत्त; एका दैदिप्यमान युगाचा अंत!!
- साताऱ्याच्या तिढ्यात, पृथ्वीराज चव्हाण अडकायला तयार नाहीत पवारांच्या जाळ्यात!!
- आतापर्यंत 2000 रुपयांच्या सुमारे 97.69 टक्के नोटा बँकांमध्ये आल्या परत
- सावरकरांच्या काळ्या पाण्यावर गलिच्छ बोलणाऱ्यांना केजरीवालांच्या तुरुंगवासाचे “कौतूक”!!