• Download App
    Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रात्री उशीरा चेन्नईच्या रुग्णालयात दाखल; पत्नीने दिले तब्येतीचे अपडेट | The Focus India

    Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रात्री उशीरा चेन्नईच्या रुग्णालयात दाखल; पत्नीने दिले तब्येतीचे अपडेट

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि साऊथ चित्रपटसृष्टीत अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवणारे सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ७३ वर्षीय रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशीरा चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. Rajinikanth

    मिळालेल्या माहितीनुसार, पोटात तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आज म्हणजेच मंगळवारी त्यांच्यावर विशेष उपचार करावे लागू शकतात. सध्या काळजी करण्याची गरज नाही, त्यांची प्रकृती स्थिर आहे. अभिनेत्याच्या पत्नीने त्यांचे हेल्थ अपडेट दिले आहे.


    Congress : मराठी माध्यमांमधून पवार + ठाकरेंना सहानुभूतीचे चित्र; प्रत्यक्षात काँग्रेसकडेच इच्छुकांचा मोठा ओढा!!


    सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना चेन्नई पोलिसांनी सांगितले की, त्यांना पोटात तीव्र वेदना होत असल्याने त्यांना चेन्नईच्या अपोलो ग्रिम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीने सुपरस्टारच्या तब्येतीचे अपडेट मीडियाला दिले आहेत. रजनीकांत यांच्या पत्नीने नुकतेच सांगितले की, आता सर्व काही ठीक आहे.

    रजनीकांत यांची प्रकृती गेल्या काही वर्षांत अनेक वेळा बिघडली आहे. त्यांचे 2016 साली अमेरिकेत किडनी प्रत्यारोपणही झाले. अलीकडेच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून राजकारणातून निवृत्तीही घेतली. सध्या ते बरे आहेत. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर रजनीकांतच्या चाहत्यांची चिंता वाढली असून ते सुपरस्टार बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

    Rajinikanth was admitted to a hospital in Chennai late at night

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी