• Download App
    ईडीचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या राजेश्वर सिंह यांचा विक्रमी मताधिक्याने विजय|Rajeshwar Singh, who resigned from ED and entered politics, won by a record majority

    ईडीचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या राजेश्वर सिंह यांचा विक्रमी मताधिक्याने विजय

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला आहे. लखनऊमधील सरोजनी नगर मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तब्बल 57 हजारांनी विजय मिळाला आहे. लखनौ मतदारसंघातून आत्तापर्यंत कुठल्याही उमेदवाराला एवढा मोठा विजय मिळाला नाही.Rajeshwar Singh, who resigned from ED and entered politics, won by a record majority

    राजेश्वर सिंह यांना 49.13 टक्के मतं मिळाली आहेत. त् समाजवादी पक्षाचे उमेदवार अभिषेक मिश्रा यांना 31.81 टक्के मतं मिळाले आहेत.ईडीतील माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांच तिकीट जाहीर झालं होतं.



    लखनौच्या सरोजनी नगर विधानसभा मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्यात आलं. सिंह हे सन 2007 मध्ये ते अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीमध्ये कार्यरत झाले होते. तत्पूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनात 10 वर्षे पोलीस खात्यात काम केलं असून 14 वर्षे ते ईडी विभागात कार्यरत होते.

    Rajeshwar Singh, who resigned from ED and entered politics, won by a record majority

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची