मस्क यांनी EVM हॅक होऊ शकते आणि ते बंद केलं पाहीजे असं म्हटलेलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इलॉन मस्क आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यात भारतीय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवरून शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ईव्हीएमबाबत मस्क यांनी काल म्हणजेच शनिवारी म्हटलं होतं की आपण ईव्हीएम बंद केलं पाहिजे. कारण, हॅक होण्याचा धोका असतो. हे मानवाकडून किंवा AI द्वारे हॅक केले जाऊ शकते. हा धोका जरी कमी असला तरी तो खूप जास्त आहे.Rajeev Chandrasekhar responded to Elon Musk statement on EVM said
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. मस्क यांच्या विधानात तथ्य नाही. त्यांनी भारतात येऊन काहीतरी शिकावे. राजीव चंद्रशेखर यांनी ईव्हीएमचे सर्व गुण सांगितले. ते म्हणाले की मस्क यांचा अर्थ असा आहे की कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवू शकत नाही. त्यांचा विचार चुकीचा आहे.
चंद्रशेखर यांनी सांगितले की मस्कची विचारसरणी यूएस आणि इतर ठिकाणी लागू होऊ शकते, जिथे ते इंटरनेट-कनेक्टेड वोटिंग मशीन तयार करण्यासाठी नियमित कंप्युट प्लॅटफॉर्म वापरतात, परंतु भारतीय ईव्हीएम कस्टम डिझाइन केलेले आहेत, सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नेटवर्क किंवा मीडियाशी कनेक्ट केलेले नाहीत. कनेक्टिव्हिटी नाही, ब्लूटूथ नाही, वायफाय नाही, इंटरनेट नाही. ते पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकत नाही.
Rajeev Chandrasekhar responded to Elon Musk statement on EVM said
महत्वाच्या बातम्या
- लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर I.N.D.I.Aचा दावा, न मिळाल्यास अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता
- लोकसभा निवडणुकीत महागाईच्या नावाने बोंबाबोंब; पण कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात पेट्रोल – डिझेलची दरवाढ!!
- गृहमंत्री अमित शाह आज जम्मू-काश्मीरला भेट देणार
- महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी फसवले; राजू शेट्टींचा संताप!!