• Download App
    उत्तर प्रदेशात जातीनिहाय जनगणना करण्याचे ओमप्रकाश राजभर यांचे आश्वासन। Rajbhar assure casewise census

    उत्तर प्रदेशात जातीनिहाय जनगणना करण्याचे ओमप्रकाश राजभर यांचे आश्वासन

    वृत्तसंस्था

    बलिया : समाजवादी पक्षाबरोबरील आमची आघाडी सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेशात जातीनिहाय जनगणना करू आणि संख्येनुसार सर्व वर्गांना प्रतिनिधित्व देऊ, असे आश्वासन सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी दिले. Rajbhar assure casewise census

    आघाडी जिंकल्यास अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील, असेही त्यांनी नमूद केले. याआधी राजभर यांनी पाच मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्र्यांना आळीपाळीने पदे देण्याची कल्पना मांडली होती. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, संकल्प भागीदारी मोर्चा सत्तेवर आल्यास हे विधान लागू होणार होते. भाजपला हटविणे आणि अखिलेशना मुख्यमंत्री बनविणे हे आमचे ध्येय आहे.

    एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी युतीच्या शक्यतेबाबत राजभर यांनी स्पष्ट केले की, ओवेसी यांनी आधी सपाबरोबरील युतीविषयी ठरवावे. त्यांनी शंभर जागा मागितल्या तर युती कशी होणार हे तुम्हीच सांगा.

    Rajbhar assure casewise census

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार