भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अरुण सिंह यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारबाबत भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ‘राजस्थानमध्ये बहिणी आणि मुली सुरक्षित नाहीत. महिला आणि दलितांवरील अत्याचाराच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपा उद्या म्हणजेच १ ऑगस्टला राजस्थान सचिवालयाचा घेराव करणार आहे. Rajasthan will not tolerate outrage now BJP will besiege the Rajasthan Secretariat tomorrow
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अरुण सिंह म्हणाले, ’28 जुलै रोजी 24 तासांत राजस्थानमध्ये 21 घटना घडल्या. बुंदीच्या लाखेरी गावात एका महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आली. पाली येथे तरुणाची हत्या, करौली येथे सात दिवसांचा मृतदेह सापडला आणि जयपूरच्या सदर भागात चाकूने एका व्यक्तीचा गळा चिरण्यात आला. राजस्थानमध्ये दररोज 17-18 बलात्काराच्या घटना घडत आहेत.
अरुण सिंह म्हणाले, ‘एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महिलांच्या छेडछाडीच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडत आहेत. मात्र राहुल गांधी, प्रियांका गांधी किंवा अन्य कोणत्याही काँग्रेस नेत्याने तेथे जाऊन पीडितांची भेट घेतली नाही.
भाजपाने म्हटले की, ‘सर्वात अशोभनीय गोष्ट म्हणजे राजस्थान विधानसभेत महिलांवरील बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांवर चर्चा होत असताना राजस्थानच्या जबाबदार मंत्री शांती धारीवाल यांनी राजस्थान हे पुरुषांचे राज्य असल्याचे सभागृहात सांगितले. राजस्थानच्या नंबर 2 मंत्र्याने असे बोलून महिलांचा अपमान केला आहे.
Rajasthan will not tolerate outrage now BJP will besiege the Rajasthan Secretariat tomorrow
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात राजकीय पक्षाच्या अधिवेशनात आत्मघाती स्फोट; 44 हून अधिक लोक मरण पावले, 100 जखमी
- ‘’…म्हणूनच उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला’’ बावनकुळेंनी लगावला टोला!
- IIT मुंबईच्या वसतिगृहाच्या कँटीनमधील पोस्टरवरून वाद; लिहिले- इथे फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी
- संसदेत आज ‘I-N-D-I-A’ची परीक्षा, दिल्ली सेवा विधेयक संमत होण्यापासून विरोधक रोखू शकतील का?