• Download App
    Rajasthan polls : काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनांवरून हिमंता बिस्वा सरमा यांचा अशोक गेहलोतांवर हल्लाबोल, म्हणाले... Rajasthan polls Himanta Biswa Sarma attacked Ashok Gehlot on Congress election promises

    Rajasthan polls : काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनांवरून हिमंता बिस्वा सरमा यांचा अशोक गेहलोतांवर हल्लाबोल, म्हणाले…

    राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेसच्या 7 हमींच्या विधानावर हल्ला चढवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत सरमा पुढे म्हणाले की, राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करेल यात शंका नाही. तुष्टीकरणाचे राजकारण करणारे आणि सर्वसामान्यांवर बोजा टाकणारे सरकार लोकांना नको आहे. Rajasthan polls Himanta Biswa Sarma attacked Ashok Gehlot on Congress election promises

    राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. भाजप आणि काँग्रेस जोरदारपणे निवडणूक रॅली घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भरतपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले.

    दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेसच्या हमीबाबतच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. आसाममध्ये पेट्रोलची किंमत 97-98 रुपये आहे आणि राजस्थानमध्ये लोक 108 रुपये मोजतात. याचा अर्थ प्रत्येक लिटरमागे लोक खरेदी करतात, त्यातील दहा रुपये अशोक गेहलोत यांच्याकडे जातात. संपूर्ण देशापेक्षा राजस्थानमध्ये वीजेसाठी जास्त किंमत मोजावी लागते. मग ते (अशोक गेहलोत) कोणत्या हमीबद्दल बोलत आहेत? असं सरमा म्हणाले.

    Rajasthan polls Himanta Biswa Sarma attacked Ashok Gehlot on Congress election promises

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Beating Retreat 2026 : विजय चौकात बीटिंग रिट्रीट समारंभ; तिन्ही सशस्त्र दलांनी राष्ट्रपती मुर्मू यांना राष्ट्रीय मानवंदना दिली; उपराष्ट्रपती आणि PM देखील उपस्थित

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट