• Download App
    Rajasthan Paper Leak Case : राजस्थान काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानावर 'ED'चा छापा Rajasthan Paper Leak Case ED raids Rajasthan Congress Presidents residence

    Rajasthan Paper Leak Case : राजस्थान काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानावर ‘ED’चा छापा

    दिल्ली आणि जयपूर येथील ईडी पथकांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर :  राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांच्या घरी  ईडीची टीम पोहोचली आहे. पीसीसी प्रमुखांच्या घरी ही कारवाई करण्यात आल्याचे कारण राजस्थानचे पेपर लीक प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली आणि राजस्थानची ईडी टीम गोविंद सिंग दोतासरा आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करत आहे. Rajasthan Paper Leak Case ED raids Rajasthan Congress Presidents residence

    मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम गोविंद सिंग दोतासरा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरीही पोहोचली आहे. RPSC पेपर लीक प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने  प्रथमच पीसीसी प्रमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. दिल्ली आणि जयपूर येथील ईडी पथकांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. ईडीची टीम दोतासराच्या जयपूर येथील निवासस्थानी आणि सीकरमधील त्यांच्या वैयक्तिक निवासस्थानीही पोहोचली आहे.

    आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ मतदारसंघातून गोविंद सिंह दोतासरा यांना उमेदवारी दिलेली आहे.

    अपक्ष आमदारावरही ‘ईडी’ची कारवाई –

    याशिवाय  अंमलबजावणी संचालनालयाने महुआचे अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार ओम प्रकाश हुडला यांच्या सात ठिकाणांवरही छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाब पेपरफुटी प्रकरणाशीही संबंधित असू शकते.

    Rajasthan Paper Leak Case ED raids Rajasthan Congress Presidents residence

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही