• Download App
    राजस्थान : 'लाल डायरी'चे रहस्य उघड झाल्यास अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार – भाजपाचा दावा! Rajasthan If the secret of  Red Diary is revealed the political existence of many leaders will be in danger  BJP claims

    राजस्थान : ‘लाल डायरी’चे रहस्य उघड झाल्यास अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार – भाजपाचा दावा!

    केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिल्लीत गेहलोत सरकारवर साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली :  भारतीय जनता पक्षाने सोमवारी राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर “भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले” असा आरोप केला आणि ‘लाल डायरी’चे रहस्य उघड झाल्यास अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल असा दावा केला. Rajasthan If the secret of  Red Diary is revealed the political existence of many leaders will be in danger  BJP claims

    एक दिवसापूर्वी, राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार राजेंद्र गुढा यांनी दावा केला होता की त्यांनी पक्षाचे नेते धर्मेंद्र राठोड यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार ‘लाल डायरी’ मिळवून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना अडचणीतून वाचवले.

    दिल्लीत पत्रकारांना संबोधित करताना, भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, “त्या लाल डायरीमध्ये असे काय आहे की संपूर्ण सरकारमध्ये ‘भीती’ आहे.” राजस्थानमधील प्रत्येकाला त्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. तसेच, गुढा यांनी उघड केलेल्या डायरीतील मजकूर समोर आल्यास अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा दावाही शेखावत यांनी केला. खाणकाम, नोकरभरती आणि परीक्षा यासारख्या विविध घोटाळ्यांशी निगडीत डायरींनी काँग्रेस सरकार बरबटलेली असल्याचा दावा त्यांनी केला.

    Rajasthan If the secret of  Red Diary is revealed the political existence of many leaders will be in danger  BJP claims

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली