जाणून घ्या, मतदानासह निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम काय असणार आहे?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या यादीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पक्षाने पहिल्या यादीत एकूण 41 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या 41 उमेदवारांपैकी 7 खासदारांनाही तिकीट देण्यात आले आहे. Rajasthan Election BJP announced the first list of candidates Seven MPs got tickets
भाजपाने झोटवाडा येथून खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांना तिकीट दिले आहे. त्याचवेळी पक्षाने मांडवा मतदारसंघातून नरेंद्र कुमार, विद्याधर नगर मतदारसंघातून खासदार दिया कुमारी, तिजारामधून खासदार बाबा बालक नाथ, सवाई माधोपूरमधून खासदार किरोरी लाल मीना, सांचोरमधून देवजी पटेल आणि भगीरथ पटेल यांना तिकीट किशनगडचे दिले आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारीच राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासोबतच या निवडणुकांचे निकाल इतर चार राज्यांसह ३ डिसेंबरला जाहीर होतील.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील निवडणुकीची अधिसूचना ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ७ नोव्हेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर असेल. २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
Rajasthan Election BJP announced the first list of candidates Seven MPs got tickets
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!