• Download App
    राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचे दोन संकल्प पूर्ण; कृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी केला एकभुक्त राहण्याचा नवा संकल्प!! Rajasthan Education Minister Madan Dilawar completed two resolutions

    राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचे दोन संकल्प पूर्ण; कृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी केला एकभुक्त राहण्याचा नवा संकल्प!!

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : श्री राम जन्मभूमी मुक्तीसाठी देशातल्या हजारो लोकांनी वेगवेगळे संकल्प केले होते आणि सातत्याने ते राम नाम जपत होते आज या हजारो लोकांचा संकल्प श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेने पूर्ण झाला. Rajasthan education minister madan Dilawar takes new resolution for Krishna janma bhumi mukti

    संकल्प करणाऱ्यांमध्ये राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचा देखील समावेश आहे. मदन दिलावर यांनी दोन संकल्प केले होते काश्मीर मधून 370 कलम हटविल्या खेरीज आरामदायी बिछान्यावर झोपणार नाही असा संकल्प त्यांनी केला होता तो 2019 मध्ये पूर्ण झाला त्यावर्षी जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटले.

    राम जन्मभूमी मुक्तीसाठी देखील त्यांनी असाच संकल्प केला होता राम जन्मभूमी मंदिर निर्माण होत नाही तिथे श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत आपण गळ्यात फूलमाला अर्पण करून घेणार नाही, असा मदन दिलावर यांचा संकल्प होता तो संकल्प आज पूर्ण झाला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मदन दिल्यावर यांच्या गळ्यात तब्बल 108 फुलमाला घातली.

    *पण मदन दिलावर हा संकल्प पूर्ण करून थांबलेले नाहीत. त्यांनी याच कार्यक्रमात नवा संकल्प जाहीर केला. जोपर्यंत कृष्णजन्मभूमी मुक्त होत नाही आणि तिथे देखील श्रीराम मंदिरासारखे भव्य श्रीकृष्ण मंदिर निर्माण होऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही, तोपर्यंत आपण एकभुक्त राहू म्हणजे दिवसातून एकाच वेळी भोजन घेऊ, असा संकल्प मदन दिलावर यांनी सोडला आहे. हा संकल्प लवकरच पूर्ण होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

    Rajasthan education minister madan Dilawar takes new resolution for Krishna janma bhumi mukti

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार