मथुरेला जात असताना उत्तर प्रदेशच्या सीमेवर घडली दुर्घटना
विशेष प्रतिनिधी
जयपूर : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुथरेला गोवर्धन गिरिराजच्या दर्शनासाठी जात असताना काल राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या कारचा अपघात झाला आहे.
कारचे चाक रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात गेल्याने, चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मुख्यमंत्री ज्या बाजूला बसले होते तो भाग खड्ड्यात गेला होता. मात्र यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.Rajasthan Chief Minister Bhajanlal Sharmas car accident
या घटनेनंतर मुख्यमंत्री भजन लाल शर्मा हे दुसऱ्या गाडीने आपल्या नियोजितस्थळी रवाना झाले. उत्तर प्रदेशची सीमा पूंधरी का लौठा जवळ त्यांच्या कारला हा अपघात झाला होता. दरम्यान राजस्थान विधानसभा अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. भाजपच्या भजन लाल शर्मा सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे.
Rajasthan Chief Minister Bhajanlal Sharmas car accident
महत्वाच्या बातम्या
- अभिनेता शाहरुखची पत्नी गौरीला ईडीची नोटीस; तुलसियानी ग्रुपची ब्रँड ॲम्बेसेडर; 30 कोटींच्या फसवणुकीचा कंपनीवर आरोप
- इंडियाच्या बैठकीत PM उमेदवारासाठी ममतांनी सुचवले खरगेंचे नाव; केजरीवालांचे समर्थन; अखिलेश यांचे मौन
- दिल्ली विधेयक राज्यसभेत मंजूर, राष्ट्रपतींकडे जाणार; आतापर्यंत विरोधी पक्षाचे 141 खासदार निलंबित
- मुख्यमंत्री शिंदेंची विधिमंडळात घोषणा- फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन; 1967 पूर्वीच्या नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले