• Download App
    राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!|Rajasthan Chief Minister Bhajan Lal Sharma threatened to kill

    राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!

    जयपूर सेंट्रल जेलमधून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण बुधवारी समोर आले आहे. जयपूर सेंट्रल जेलमधून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.Rajasthan Chief Minister Bhajan Lal Sharma threatened to kill



    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्माला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन ट्रेस केले असता ते जयपूर सेंट्रल जेल असल्याचे निष्पन्न झाले. कारागृहातील एका कैद्याने नियंत्रण कक्षाला फोन करून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.

    जयपूर मध्यवर्ती कारागृहातून आलेल्या कॉलमुळे जेलर आणि डेप्युटी जेलरला निलंबित करण्यात आले आहे. कारागृहात मोबाईल फोन आणि सिमकार्ड कसे पोहोचले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी लाल कोठी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

    Rajasthan Chief Minister Bhajan Lal Sharma threatened to kill

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप