राजस्थान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी पण केला आहे. जोपर्यंत राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करत नाही, तोपर्यंत हार आणि साफा घालणार नाही, एवढेच नाही तर रात्रीचे करणार नाही अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
अलिगड : राजस्थान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी पण केला आहे. जोपर्यंत राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करत नाही, तोपर्यंत हार आणि साफा घालणार नाही, एवढेच नाही तर रात्रीचे करणार नाही अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात अलिगडमध्ये एका सभेत सतीश पुनिया बाेलत हाेते. ते म्हणाले, राजस्थानमध्ये पक्षाची सत्ता येईपर्यंत मी हार घालणार नाही आणि रात्रीचे जेवण करणार नाही. मी संकल्प केला आहे की जोपर्यंत आपण 2023 मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसला उखडून टाकत नाही आणि भाजपला प्रचंड बहुमत देत नाही, तोपर्यंत मी हार घालणार नाही, साफा घालणार नाही आणि रात्रीचे जेवण करणार नाही.
2014 मध्ये राजस्थानमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार येईपर्यंत साफा न घालण्याची प्रतिज्ञा केली हाेती. डिसेंबर 2018 मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता आली, तेव्हा पायलट यांनी साफा घातला होता.