वृत्तसंस्था
लखनौ : महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलेल्या पावसाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारतात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातील पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्याचा फटका अनेक शहरांना बसला आहे. Rainfall in northern India, due to the flooding of the Ganges Disrupted public life; Farmland under water
पुराच्या तडाख्यात वाराणसीतील काही गावंही बुडाली आहे. वाराणसीत गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारच्या गावांचा त्याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं प्रचंड नुकसान झाले आहे. वाराणसीतील रमना गाव तर निम्मे गाव जलमय झालं आहे. शेती गंगा नदीच्या पाण्याखाली गेली आहे. बोटीतून लोकांना वाचवलं जात आहे. नागरिक प्रशासनाच्या मदतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. वाराणसीतील रोहनिया विधानसभा मतदारसंघात रमना गाव येते. तेथे ४० हजारपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे.
गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
गावांना जोडणारे मार्ग पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटला आहे. वाराणसीत गंगा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरामुळे रमना गावात हाहाकार उडाला आहे. गावातील ७० टक्के लोकसंख्या भाजीपाल्याच्या शेतीवर अवलंबून आहे. गंगेला पूर आल्याने अर्ध्याहून जास्त शेती पाण्यात आहे.
संरक्षक भिंत बनवल्यास पुराचा धोका टळणार
नदीकिनारी संरक्षक भिंत बनवल्यास पुराचं पाणी रोखता येत. यासाठी सर्वेक्षण झालं आहे. परंतु काम मार्गी लागले नाही. त्याचा फटका नागरिकांना बसला.
केवळ शेतजमिनी गेल्या पाण्याखाली
रमना गावाचे ग्रामसचिव लालबहादुर पटेल म्हणाले की, गावात मेडिकल पथक, पंचायत सचिव आणि लेखापाल तैनात केले आहेत. जमिनीचे काही नुकसान झालेले नाही. केवळ शेतजमिनी पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.
Rainfall in northern India, due to the flooding of the Ganges Disrupted public life; Farmland under water
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगामधील महापुराचेही खापर फोडले मोदी सरकारवर
- काश्मीरियत माझ्या नसानसांत भिनलेली, राहुल गांधी यांचे काश्मीर भेटीत वक्तव्य
- गंगा, यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली, उत्तर प्रदेशात लाखो लोकांच्या मनात धडकी
- सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले