• Download App
    विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकणात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज ; ऑरेंज, यलो अलर्ट जारी Rainfall forecast for next two days in Vidarbha, North Central Maharashtra, Konkan

    विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकणात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज ; ऑरेंज, यलो अलर्ट जारी

    वृत्तसंस्था

    मुंबई : पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज आहे. परंतु राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार आहे, असे भारतीय हवामान विभागाने दिले. Rainfall forecast for next two days in Vidarbha, North Central Maharashtra, Konkan

    उत्तर कोकणात प्रमुख्याने पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल.पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

    विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट जारी केला आहे.

    उत्तर मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिकमधील घाट माथ्यावर मुसळधार सरींचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगावसाठी यलो अलर्ट तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

    Rainfall forecast for next two days in Vidarbha, North Central Maharashtra, Konkan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : ‘मी नेहरूंचा अंध समर्थक नाही, पण त्यांची लोकशाहीतील भूमिका अमूल्य’ – शशी थरूर यांची भाजपवर संयत टीका

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- नेहरूंच्या चुका स्वीकारणे आवश्यक, पण प्रत्येक समस्येसाठी त्यांना एकट्याला दोषी ठरवणे चुकीचे

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते