वृत्तसंस्था
मुंबई : पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज आहे. परंतु राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार आहे, असे भारतीय हवामान विभागाने दिले. Rainfall forecast for next two days in Vidarbha, North Central Maharashtra, Konkan
उत्तर कोकणात प्रमुख्याने पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल.पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट जारी केला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिकमधील घाट माथ्यावर मुसळधार सरींचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगावसाठी यलो अलर्ट तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Rainfall forecast for next two days in Vidarbha, North Central Maharashtra, Konkan
महत्त्वाच्या बातम्या
- प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेशात मुसलमानांना फक्त दहा घरे मंजूर; असदुद्दीन ओवैसी यांचा अजब दावा
- भाजपने चार मुख्यमंत्री बदल्याच्या बदलण्यावरून गडकरींच्या टोलेबाजीची माध्यमांची मखलाशी, पण काँग्रेसमधील मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या अस्वस्थतेचे काय?
- Defamation case : कंगना रणावत न्यायालयात पोहोचलीच नाही, न्यायाधीश म्हणाले – जर ती पुढील सुनावणीला आली नाही तर तिच्या नावाचे अटक वॉरंट जारी केले जाईल
- आमचेही प्रश्न सोडवा; शिवसैनिकाचा टाहो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ४०० किलोमीटरचा प्रवास