• Download App
    वीज नव्हे, आता हायड्रोजनवर धावणार रेल्वे; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत घोषणा|Railways will run on hydrogen, not electricity; Railway Minister Ashwini Vaishnav's announcement in Parliament about the ambitious project

    वीज नव्हे, आता हायड्रोजनवर धावणार रेल्वे; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत घोषणा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सध्या देशातील रेल्वेगाड्या इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनवर धावत आहेत. भविष्यात मात्र बदल दिसू शकतात. खरे तर इलेक्ट्रिक इंजिनांऐवजी आता हायड्रोजनवर चालणारी इंजिने विकसित करण्याचे काम सुरू आहे.Railways will run on hydrogen, not electricity; Railway Minister Ashwini Vaishnav’s announcement in Parliament about the ambitious project

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, आम्ही लवकरच हायड्रोजन इंधन सेलचा वापर करून रेल्वेगाडी चालवण्यात यशस्वी होऊ.



    वैष्णव यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, आम्ही या अभिनव प्रकल्पाबाबत उत्सुक आहोत. सध्या हा पायलट प्रोजेक्ट म्हणून हाती घेतला जात आहे. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाने बनवलेल्या ट्रेनचे उत्पादन इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईत केले जाईल.

    वैष्णव म्हणाले, हायड्रोजनवर चालणारा रेल्वे प्रकल्प शाश्वत वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती दर्शवितो. हा प्रकल्प सरकारच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची भारतीय रेल्वेची कटिबद्धता दर्शवतो.

    ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी हैदराबादमध्ये ड्रोन पोर्ट उभारले जाणार : मुख्यमंत्री रेड्डी

    ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी तेलंगण सरकार हैदराबादमध्ये ड्रोन पोर्ट बांधणार आहे. ड्रोन वैमानिकांच्या प्रगत प्रशिक्षणासाठी स्टेट एव्हिएशन अकादमीने इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरशी (एनआरएसशी) करार केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केली. या घोषणेमागील उद्दिष्ट वैमानिक प्रशिक्षणाच्या वाढत्या मागणीकडे लक्ष देणे आणि ड्रोन उत्पादक कंपन्यांसाठी चाचण्या सुलभ करणे हा असल्याचे सांगितले जाते. येथे वैमानिकांना डेटा विश्लेषण, डेटा प्रोसेसिंग आणि मॅपिंग यासारख्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

    शून्य कार्बन टार्गेटवर रेल्वेचे काम सुरू

    2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वे नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. रेल्वे पूल आणि स्टार रेटिंग करण्यासोबतच, रेल्वे गाड्यांना अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचे काम करत आहे, जेणेकरून गाड्या वेळेवर धावू शकतील, ज्यामुळे इंधनाची बचत होईल.

    Railways will run on hydrogen, not electricity; Railway Minister Ashwini Vaishnav’s announcement in Parliament about the ambitious project

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी