• Download App
    राजधानी ठप्प राजधानी रद्द! शताब्दी, राजधानी, दुरंतो, वंदे भारत एक्स्प्रेससह २८ रेल्वेगाड्या रद्द , येथे पहा संपूर्ण यादी ! Railways suspends Shatabdi, Rajdhani, Duranto Express among 29 trains from May 9

    राजधानी ठप्प राजधानी रद्द! शताब्दी, राजधानी, दुरंतो, वंदे भारत एक्स्प्रेससह २८ रेल्वेगाड्या रद्द ; येथे पहा संपूर्ण यादी

    • प्रवाशांची घटलेली संख्या आणि देशातील कोरोनातील वाढ लक्षात घेता रेल्वेने पुढच्या आदेशापर्यंत लांब पल्ल्याच्या 28 गाड्या रद्द केल्या आहेत. यात शताब्दी, राजधानी, दुरंतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे.

    • एकीकडे कोरोना काळात भारतीय रेल्वेकडून अनेक विशेष रेल्वे चालविल्या जात आहेत तर दुसरीकडे याच कोरोनाचा फटका बसल्याने कार्यान्वित असलेल्या अनेक विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली:प्रवाशांची कमतरता आणि देशात कोरोनाचे संकट  लक्षात घेता पुढील आदेशांपर्यंत  रेल्वेने २८ लांब-अंतराच्या गाड्या रद्द केल्या आहेत. यात शताब्दी, राजधानी, दुरंतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. उत्तर रेल्वेने आज एका निवेदनात ही माहिती दिली. Railways suspends Shatabdi, Rajdhani, Duranto Express among 29 trains from May 9

    रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये नवी दिल्ली-हबीबगंज शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-कालका शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-देहरादून शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी स्पेशल आणि नवी दिल्ली-चंडीगड शताब्दी स्पेशलचा समावेश आहे. पुढील आदेश होईपर्यंत ९ मेपासून ते रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नवी दिल्ली-देहरादून जनशताब्दी स्पेशल १० मे आणि नवी दिल्ली-उना जनशताब्दी स्पेशल ९ मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द केल्या आहेत .

    दुरंतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस देखील रद्द

    रेल्वेने निझामुद्दीन-पुणे दुरंतो स्पेशल १० मे पासून आणि सराई रोहिल्ला-जम्मू दुरंतो स्पेशल ९ मेपासून पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. निजामुद्दीन-चेन्नई राजधानी स्पेशल १२ मे आणि नवी दिल्ली-बिलासपूर राजधानी स्पेशल ११ मेपासून रद्द करण्यात येणार आहेत.
    दिल्ली-कटरा वंदे भारत स्पेशल एक्सप्रेस ९ मे पासून रद्द करण्यात आली आहे. कोरोना काळातील नियमित गाड्या ऑपरेशनसाठी बंद आहेत, परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विशेष गाड्या चालवित आहे.

    Railways suspends Shatabdi, Rajdhani, Duranto Express among 29 trains from May 9

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!