• Download App
    भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विक्रम; कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ३६ दिवसांत २१००० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची देशभरात वाहतूक railways-delivers-over-21000-mt of oxygen so far in india

    भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विक्रम; कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ३६ दिवसांत २१००० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची देशभरात वाहतूक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोविड काळात देशात लॉकडाऊन आणि निर्बंध असताना भारतीय रेल्वेने मात्र, अविरत सेवा देत ३६ दिवसांमध्ये तब्बल २१३९२ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक केली आहे. रेल्वे मंत्रालयाने आज सविस्तर आकडेवारी सादर केली. railways-delivers-over-21000-mt of oxygen so far in india

    रेल्वेने कोविडच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३६ दिवसांमध्ये देशभरात १२७४ ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक केली. देशभरात या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत ३१३ स्पेशल ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यात आल्या. देशाच्या कानाकोपऱ्यात ऑक्सिजन टँकर्स अत्यंत वेगाने पोहोचविण्यात आले. हरियाणा आणि कर्नाटक या राज्यांसाठी प्रत्येकी २००० मेट्रीक टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली.



    पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस २४ एप्रिलला महाराष्ट्रासाठी १२६ मेट्रीक टन ऑक्सिजन टँकर्स भरून पाठविण्यात आली. त्यानंतर देशातल्या प्रत्येक राज्यांमध्ये ही सेवा अविरतपणे सुरूच आहे. तामिळनाडू आणि तेलंगणाला प्रत्येकी १८०० मेट्रीक टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली आहे. देशभरातल्या १५ राज्यांमधल्या ३९ शहरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतूकीसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे तेथे ऑक्सिजन नियोजित वेळेपेक्षा १५ तास आधी पोहोचू शकला. रेल्वे मंत्रालयाबरोबरच स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारांनीही यात सहकार्य केले, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे…

    railways-delivers-over-21000-mt of oxygen so far in india

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य