विशेष प्रतिनिधी
भोपाळ : कोरोनाचा विषाणू ओळखण्यासाठी रेल्वे खास संवेदनशील डबे तयार करीत आहे. या डब्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर हा विषाणू नष्ट होणार आहे. यासाठी प्रतिपिंड (प्लाझ्मा) उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. हवेच्या माध्यमातून या तंत्राद्वारे कोरोना विषाणू नष्ट करण्याची व्यवस्था या डब्यामध्ये असेल.Railway will making special anti corona boggis
हा विशेष डबा सर्वांत प्रथम ‘शान-ए-भोपाळ एक्स्प्रेस’ला जोडला जाणार आहे.या विशेष डब्याची अनेक वैशिष्टे आहेत. यात दरवाजाच्या कड्यांना तांब्याचा मुलामा असेल तसेच मानवी स्पर्श कमी होईल याची खबरदारी घेतली जाईल.
डब्यात टायटेनियम डाय ऑक्साईडचे आवरण असेल ज्यावर कोरोनाचा विषाणू अस्तित्वात राहू शकत नाही. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहातील नळ, सोप डिस्पेन्सर ‘टचलेस’ असेल.कोरोनाची साथ रोखण्यासाठी रेल्वेने ‘लिंक हॉफमेन बुश’ (एलएचबी) या प्रकारच्या डब्यांचे रूपांतर कोरोना संवेदनशील डब्यात करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
यासाठी ‘एसी’ डब्यात ‘प्लाझ्मा एअर’ उपचार पद्धतीने कोरोनाचा प्रसार करणारा विषाणू काही तासातच नष्ट होईल. असा डबा ‘एसी’सह सामान्य श्रेणीसाठीही तयार करण्यात येईल.
Railway will making special anti corona boggis
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे कॉरोनामुळे निधन
- विजय मल्याचे शेअर्स विकून होणार ६,२०० कोटी रुपयांची वसुली
- देशाचे कायदे सर्वोच्च, तुमची धोरणे नाही, संसदीय समितीने ट्विटरला फटकारले
- ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन ; पत्नी पाठोपाठ घेतला जगाचा निरोप!
- जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा ; मौल्यवान हिरा आढळला