• Download App
    रामविलास पासवान यांचा बंगला मिळणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना, घर खाली करण्यासाठी चिराग पासवान यांना नोटीस|Railway Minister Ashwini Vaishnav to get Ram Vilas Paswan's bungalow, notice to Chirag Paswan to vacate house

    रामविलास पासवान यांचा बंगला मिळणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना, घर खाली करण्यासाठी चिराग पासवान यांना नोटीस

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे अधिकृत निवासस्थान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी सरकारमध्ये नुकतेच केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्त झालेले वैष्णव सध्या एका फ्लॅटमध्ये राहत आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळातील स्थानानुसार त्यांना लुटियन्स दिल्लीमधील आठव्या श्रेणीतील बंगला मिळणे अपेक्षित आहे.Railway Minister Ashwini Vaishnav to get Ram Vilas Paswan’s bungalow, notice to Chirag Paswan to vacate house

    पासवानांचे 12, जनपथ याठिकाणी राम विलास पासवान गेल्या ३१ वर्षांपासून राहत होते. १९८९ मध्ये या बंगल्यात ते राहायला गेले. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत तेथे राहिले. आताही हा बंगला चिराग पासवान यांच्या ताब्यात आहे. चिराग संपूर्ण आयुष्य याच बंगल्यात राहत आहेत.



     

    केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने चिराग पासवान यांना नोटीस पाठवून त्यांच्या दिवंगत वडिलांना दिलेला बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे. 14 जुलै रोजी चिरागला तिसरी नोटीस पाठवण्यात आली आहे.

    चिराग यांचे काका आणि रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पारसही केंद्रीय मंत्री बनले आहेत. मी रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी आहे, असे पशुपती कुमार पारस म्हणतातत्यांनाही हा बंगला देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, त्यांनी नकार दिला आहे.

    चिराग यांनी अद्याप बंगला रिकामा केला नसला तरी वैष्णव यांनीही त्यासाठी घाई करण्याचे टाळले आहे. याचे कारण म्हणजे चिराग सध्या बिहारमध्ये वडिलांच्या स्मरणार्थ काढलेल्या यात्रेत आहे. पासवान कुटुंबाला रामविलास पासवान यांच्या पहिल्या पुण्यतिथीपर्यंत हा बंगला आपल्या ताब्यात हवा आहे. गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी रामविलास पासवान यांचे निधन झाले होते.

    Railway Minister Ashwini Vaishnav to get Ram Vilas Paswan’s bungalow, notice to Chirag Paswan to vacate house

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे