वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरपर्यंत पहिली मालगाडी रेल्वे धावली असून ७५ वर्षात प्रथमच राज्याला रेल्वेसेवा बहाल केल्याने नागरिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. Railway freight train to Manipur; In 75 years Enthusiasm among the citizens by awarding the first service
पंतप्रधान मोदी म्हणाले, या पहिल्या मालगाडीमुळे यामुळे राज्याचा व्यापार आणि संपर्क वाढणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर भारतीय रेल्वेची मालगाडी प्रथमच मणिपूरला पोहोचली. २७ जानेवारी रोजी ही मालगाडी मणिपूरमधील राणी गैडिनलियू स्टेशनवर पोहोचली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, यामुळे राज्यात देशाच्या सर्व भागात माल पोहोचेल. मालगाडी पोचल्याचा ऐतिहासिक व्हिडिओ मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये लोक रेल्वेचे जल्लोषात स्वागत करताना दिसले होते.
पॅसेंजर ट्रेन सेवा २०१६ मध्ये प्रथम
पहिली पॅसेंजर ट्रेन १०१६ मध्ये मणिपूरमध्ये आली होती. शिलाँगमध्ये पंतप्रधान मोदींनी आसाममधील मिझोराम, मणिपूर आणि कामाख्यासाठी तीन नवीन ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला होता. मणिपूरसाठी ही पहिली ब्रॉडगेज पॅसेंजर ट्रेन होती. ज्याने मणिपूरच्या जिरीबामला सिलचरशी जोडले. ऑल इंडिया रेडिओ न्यूजने याबाबत २७ मे २०१६ रोजी ट्विट केले होते.
Railway freight train to Manipur; In 75 years Enthusiasm among the citizens by awarding the first service
महत्त्वाच्या बातम्या
- Budget 2022 : राज्यसभेच्या सदस्यांसाठी आचारसंहिता जाहीर, कामकाज सुरळीत चालण्यासाठी लागू होणार हे नियम, वाचा सविस्तर…
- पेगाससवरून विरोधकांनी पुन्हा केंद्राला घेरले : राहुल गांधींचा आरोप –मोदी सरकारने देशद्रोह केला!, सुब्रमण्यम स्वामी म्हणतात- मोदी सरकारने खंडन करावे!
- टेलिकॉम कंपन्यांना ट्रायच्या सूचना : प्रीपेड मोबाइल ग्राहकांना रिचार्जची वैधता २८ ऐवजी ३० दिवस द्यावी लागेल
- राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? मानहानीच्या खटल्याची ठाण्यातील न्यायालयात दररोज होणार सुनावणी