• Download App
    Railway Board officials मुंबईतल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग; लोकलमध्ये नव्या डिझाईनचे कोच 2026 जानेवारी पर्यंत सेवेत करणार रुजू!!

    मुंबईतल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग; लोकलमध्ये नव्या डिझाईनचे कोच 2026 जानेवारी पर्यंत सेवेत करणार रुजू!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मुंबईतल्या रेल्वे अपघातामध्ये प्रवाशांचे बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून मुंबई आणि देशातल्या अन्य लोकलमध्ये नव्या डिझाईनचे कोच बसविण्याचा निर्णय रेल्वेने तातडीने घेतला आहे नव्या डिझाईनचे कोच जानेवारी 2026 पर्यंत सेवेत रुजू करण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

    मुंबईतल्या रेल्वे अपघातात प्रवाशांचे बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाची तातडीची बैठक झाली. या बैठकीत रेल्वेच्या कोचच्या डिझाईन संदर्भात सविस्तर चर्चा झाली. विशेषतः नॉन एसी कोच डिझाईन करताना कोणते घटक त्यात समाविष्ट केले पाहिजेत यावर विशेषत्वाने भर दिला गेला.

    • नॉन एसी रेल्वेच्या कोच मध्ये प्रत्येक दरवाजाला लवर्स अर्थात झडपा लावणे. व्हेंटिलेशन साठी जास्त जागा उपलब्ध करून देणे
    • कोचच्या टपावर व्हेंटिलेशनची व्यवस्थित सोय करणे
    • एका कोच मधून दुसऱ्या कोच मध्ये जाण्यासाठी व्यवस्थित मार्गिका तयार करणे

    या तीन घटकांचा समावेश करून नवीन कोच 2025 पर्यंत डिझाईन केले जातील. नोव्हेंबर 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत महिनाभर ते चाचणी स्वरूपात वापरले जातील आणि प्रत्यक्ष 2026 जानेवारी महिन्यात नव्या डिझाईनचे कोच नॉन एसी गाड्यांमध्ये सेवेत रुजू केले जातील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

    Railway Board officials had a detailed meeting with the ICF

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BJP Protests : राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या पुतळ्यांचे दहन; PM मोदींबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा भाजपकडून निषेध

    Despite Trump : ट्रम्पच्या टॅरिफच्या धमकी नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ सुरूच, जीडीपी 7.8 टक्क्यांवर

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा