• Download App
    रेल्वेची सर्वसामान्यांना भेट, वातानुकूलित थ्री टायर इकॉनॉमी प्रवास स्वस्त होणार|Rail travel for the common man, air-conditioned three tier economy travel will be cheaper

    रेल्वेची सर्वसामान्यांना भेट, वातानुकूलित थ्री टायर इकॉनॉमी प्रवास स्वस्त होणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सर्वसामान्यांना रेल्वेकडून नवीन भेट मिळणार आहे. येत्या सप्टेंबरपासून एसी थ्री टायर इकॉनॉमी श्रेणीत प्रवास करता येणार आहे. सामान्य एसी थ्री टायर प्रवासाच्या तुलनेत 8 टक्के स्वस्त राहणार आहे. हा जगात सर्वांत स्वस्त वातानुकूलीत प्रवास राहणार असल्याचा रेल्वेचा दावा आहे.Rail travel for the common man, air-conditioned three tier economy travel will be cheaper

    नव्या एसी थ्री टायर इकॉनॉमी श्रेणीच्या डब्यातील प्रवासात बर्थचा पर्याय निवडताना प्रवाशांना मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये शयनयान प्रवासाच्या मूळ भाड्याच्या 2.4 पट भाडे द्यावे लागतील. 300 किलोमीटरपर्यंत प्रवासभाडे 440 रुपये इतके असेल. अंतर वाढल्यास भाड्याच्या रकमेत वाढ होत जाईल.



    4951-5000 किलोमीटरच्या जास्तीत जास्त अंतराच्या टप्प्याचे प्रवास भाडे 3,065 रुपये असेल. याशिवाय आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क, एसी 3 श्रेणीसाठीची जीएसटी वेगळे जोडण्यात येतील. तिकिट रद्द करण्याच्या स्थितीत रेल्वे नियम लागू असतील.

    इकॉनॉमी एसी कोचमध्ये 83 बर्थची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दोन बैठकांतील अंतर कमी करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे कोणतीही असुविधा होणार नाही. यात अन्य कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, वातानुकूलीत थ्री टायर इकॉनॉमी श्रेणीच्या डब्यात वैयक्तिक दिव्यांची सोय, एसी व्हेंट्स, यूएसबी प्वाईंट, मोबाईल चार्जिंग प्वाईंट यासह टॉयलेटमध्येही बदल करण्यात आला आहे.

    या योजनेअंतर्गत 1 ते 300 किमीपर्यंतचे भाडे 440 रुपये असणार आहे. 301 ते 310 किमीपर्यंत 449 रुपये, 401 ते 410 किमीपर्यंत 552 रुपये, 601 ते 610 किमीपर्यंत 778 रुपये, 701 ते 710 किमीपर्यंत 874 रुपये, 801 ते 810 किमीपर्यंत 956 रुपये, 901 ते 910 किमीपर्यंत 1032 रुपये, 1001 ते 1025 किमीपर्यंत 1121 रुपये, 1501 ते 1525 किमीपर्यंत 1450 रुपये, 2001 ते 2025 किमीपर्यंत 1774 रुपये, 3001 ते 3050 किमीपर्यंत 2218 रुपये असे भाडे असणार आहे.

    Rail travel for the common man, air-conditioned three tier economy travel will be cheaper

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!