वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वागतासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या मेघडंबरीला फुलांची विशेष सजावट करण्यात आली. तसेच रायगडावर रेड कार्पेट अंथरल आहे. अडीच हजार पोलिस, रेड कार्पेट, फुलांची सजावट, एनएसजी कमांडो अशी तयारी या दौऱ्याच्या निमित्ताने केली. Raigad decorated for President’s reception, tight security; police camp in the area
रायगडाकडे जाणारे सर्व रस्ते पर्यटकांसाठी बंद केले आहेत. पोलिस बंदोबस्तासह, एसपीजी कमांडोजही तैनात आहेत. यापूर्वी माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी १९८५ मध्ये रायगडाला भेट दिली होती. त्यानंतर राष्ट्रपती कोविंद रायगडावर येणारे दुसरे राष्ट्रपती आहेत.
अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो, राज्य राखीव दल, शिघ्र कृती दलाचे कर्मचारी तैनात आहेत. दुपारी १२ वाजता राष्ट्रपती हेलिकॉप्टरने पाचाड येथे दाखल होणार आहे. तेथून रोपवेने ते किल्ल्यावर जाणार आहेत.
राष्ट्रपती कोविंद राजसदरेवर महाराजांच्या सिंहासनावरुढ पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. यानंतर होळीचा माळ आणि शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळालाही भेट देणार आहेत.