वृत्तसंस्था
मुंबई : Raj Kundra’s ईडीने अश्लील (पोर्नोग्राफी) आणि प्रौढांसाठीच्या चित्रपटांच्या कथित वितरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा तसेच इतर काहीं जणांवर छापे मारले. शुक्रवारी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये कुंद्रा आणि इतर काही व्यक्तींची निवासस्थाने आणि कार्यालयांचा समावेश आहे. ईडीने छापेमारीदरम्यान राज कुंद्राची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.Raj Kundra’s
हे प्रकरण मे २०२२ मधील आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुंद्रा आणि इतर काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला. कुंद्राविरुद्ध मनी लाँड्रिंगचे हे दुसरे प्रकरण आहे. वर्षाच्या सुरुवातीला ईडीने क्रिप्टो करन्सी प्रकरणात कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांची ९८ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना जप्तीच्या आदेशाविरोधात दिलासा मिळाला. कुंद्रा यांनी २०२१ मध्ये न्यायालयात सांगितले की, मुंबई पोलिसांकडे पोर्न फिल्म गँगमध्ये वापरण्यात आलेल्या ‘हॉटशॉट्स’ ॲपला कोणत्याही कायदेशीर गुन्ह्याशी जोडता येईल, याचे पुरावे नाहीत. ईडीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी हॉटशॉट्स ॲपवर अश्लील साहित्य अपलोड केले. कुंद्रा यांनी दावा केला होता की, कथित पोर्न मटेरियल बनवण्यात त्यांचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही. आपल्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
Raids on Raj Kundra’s bungalow in money laundering case; ED takes action at 15 places in Mumbai, UP
महत्वाच्या बातम्या
- Imtiaz Jalil ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
- India China border भारत-चीन सीमेवर वसलेल्या गावांमध्ये स्थलांतर होणार नाही!
- Priyanka Gandhi : CWC च्या बैठकीत प्रियांका गांधींची बॅलेट पेपरवर निवडणुकीची वकिली; पण CWC च्या ठरावात ठाम उल्लेख टाळला!!
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला!