वृत्तसंस्था
मुंबई /कनोज : कनोज मधील प्रख्यात अत्तर उत्पादक आणि व्यापारी पियुष जैन यांच्या घरांवर मुंबई आणि कनोज मध्ये छापेमारी करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने मारलेल्या छाप्यांमध्ये करोडोंची रोख रक्कम सापडली असून ही मोजण्यासाठी अनेक मशीन्स मागण्यात आली आहेत. याखेरीज अनेक शेल कंपन्यांच्या नावाच्या बनावट नोंदींची अनेक कागदपत्रे सापडली असून त्यांची छाननी करण्यात येत आहे. हे तेच पियुष जैन आहेत की ज्यांनी समाजवादी अत्तराची निर्मिती केली आहे.
Raids on Piyush Jain’s houses; Crores of cash seized;
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला फायदा होण्याच्या दृष्टीने पियुष जैन यांनी समाजवादी अत्तराची निर्मिती केली आहे त्यावेळी या अत्तराचे आणि त्यांचे फार कौतुक झाले होते. त्यांच्या मुंबईतल्या घरांवर आणि कनोज मधल्या घरांवर छापेमारी केल्यानंतर करोडोंची संपत्ती उघड झाली आहे. मोठ-मोठ्या कपाटांमध्ये नोटा भरून ठेवल्याचे आढळून आले आहे. प्राप्तिकर चुकविण्याबद्दल पियुष जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विरोधात आधीच काही केसेस सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली असता अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या बरोबरच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली आहे. तिची मोजणी सुरू असून गुरुवारी सकाळी पासून सुरू असलेली छापे अजूनही सुरू आहे. नोटा मोजण्याच्या अनेक मशीनद्वारे रोख रक्कम मोजण्याचे काम सुरू आहे. मोजून झाल्यानंतर या संदर्भातली माहिती प्राप्तिकर विभाग जाहीर करणार आहे.