वृत्तसंस्था
वाराणसी : भारत जोडो यात्रा केलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आपला वाराणसी दौरा स्वतःहून रद्द केला. ते वाराणसीला गेले नाहीत. पण काँग्रेसने मात्र त्याविषयी वेगळेच कॅम्पेन सुरू केले असून राहुल गांधींचे विमान वाराणसी विमानतळावर लँड करू द्यायला एअरपोर्ट एथॉरिटीने नकार दिल्याचा आरोप केला आहे. Rahulji’s Varanasi tour automatically canceled
प्रत्यक्षात राहुल गांधी रविवारी एआर एअरवेज कंपनीच्या चार्टर्ड प्लेनने वाराणसी दौऱ्यावर येणार होते. त्याची तयारी देखील काँग्रेस पक्षाने केली होती. पण ऐनवेळेला राहुल गांधींच्या टीमने त्यांचा वाराणसी दौरा रद्द केला. त्या संबंधातली माहिती देखील एआर एअरवेजने पत्र लिहून एअरपोर्ट एथॉरिटीला कळवली होती.
त्यामुळे अर्थातच राहुल गांधींचे विमान वाराणसीत लँड होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, तरी देखील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या दौरा रद्द होण्याचे खापर एअरपोर्ट एथॉरिटी आणि भाजप सरकारवर फोडले. राहुल गांधींच्या लोकप्रियतेमुळे भाजपचे सरकार घाबरले आणि त्यांनी त्यांचे विमान वाराणसी विमानतळावर उतरून दिले नाही. एअरपोर्ट एथॉरिटीवर त्यासाठी दबाव आणला, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
प्रत्यक्षात एअरपोर्ट एथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात खुलासा देखील केला आहे. त्याचवेळी काँग्रेसचे षडयंत्र देखील उघड केले आहे. राहुल गांधींचा दौरा रद्द झाल्याचे त्यांच्याच टीम कडून सांगितल्यानंतर त्यांचे विमान लँड न होऊ देणे हा प्रश्नच उद्भवत नव्हता. कारण ते चार्टर्ड विमानातून आलेच नाहीत, असा खुलासा एअरपोर्ट एथॉरिटीने केला आहे. पण या निमित्ताने काँग्रेसने खोटे कॅम्पेन चालविल्याचे देखील उघड झाले आहे.
Rahulji’s Varanasi tour automatically canceled
महत्वाच्या बातम्या
- अदानी Vs हिंडेनबर्ग प्रकरणी केंद्र स्थापन करणार तज्ज्ञ समिती : केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला देणार तज्ज्ञांची नावे, सेबीही मजबूत करणार
- द फोकस एक्सप्लेनर : किती पॉवरफुल असतात राज्यपाल? पंतप्रधानांपेक्षाही जास्त असतो पगार, अटकही होऊ शकत नाही!
- द फोकस एक्सप्लेनर : राहुल गांधींना का बजावण्यात आली नोटीस? संसदेतील विशेषाधिकाराचा भंग म्हणजे काय? वाचा सविस्तर